Top News पुणे महाराष्ट्र

कुस्ती चळवळीचा मार्गदर्शक काळाच्या पदड्याआड- अजित पवार

बारामती | भारताचे पहिले हिंदकेसरी पैलवान श्रीपती खंचनाळे यांचं आज निधन झालं आहे. राज्याच्या कुस्ती चळवळीचा आधारस्तंभ, उदयोन्मुख कुस्तीपटूंचा मार्गदर्शक, प्रेरणास्रोत आज काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीपती खंचनाळे यांना श्रद्धांजली वाहिली.

श्रीपती खंचनाळे यांच्या निधनाने राज्याच्या कुस्ती क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. महाराष्ट्रातील कुस्ती चळवळीला आणि कुस्तीपटूंना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव मिळवून देणे, हीच खंचनाळे यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

श्रीपती खंचनाळे यांनी त्यांच्या जीवनात अनेक कुस्त्या जिंकल्या. वडिलांकडून आलेला कुस्तीचा वारसा त्यांनी पुढच्या पिढीपर्यंत, राज्यातल्या अनेक पहिलवानांपर्यंत पोहचवला असल्याचं अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.

दरम्यान, 1959 ला दिल्लीत झालेल्या कुस्तीत श्रीपती खंचनाळे यांनी त्यावेळचा दिग्गज पहेलवान रुस्तम-ए-पंजाब बत्तासिंगला हरवून हिंदकेसरी पटकावलं.

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! पुण्यातील ‘या’ पोलीस स्टेशनमध्ये महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न!

3 कोटी काय अद्याप 1 रूपयाही खर्च केला नाही; धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण

घरात पाकिस्तानचं क्रेडिट कार्ड सापडल्याच्या वृत्तावर प्रताप सरनाईकांनी केला खुलासा; म्हणाले…

रशिया-अमेरिकेवर मुख्यमंत्री बोलतात, महाराष्ट्रात काय दिवे लावलेत बोला- देवेंद्र फडणवीस

शेतकरी आंदोलनाचा गैरफायदा घेण्याच्या प्रयत्नात ‘तुकडे-तुकडे गॅंग’-रविशंकर प्रसाद

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या