बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तुमचंही कमी वयात टक्कल पडतंय का? जाणून घ्या कारण

मुंबई | सध्याच्या धावत्या जगात आपण आपल्या आरोग्याकडं जास्त लक्ष देत नाहीत. ऑफिस, काॅलेज, काम, उद्योग या सर्वांच्या परिणामी आपण आपल्या आरोग्याकडं दररोज लक्ष देत नाहीत. परिणामी आपल्याला विविध आजार व्हायला लागतात. सध्या सर्व वयाच्या व्यक्तींना एका आजाराला सामोरं जावं लागत आहे. सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी आपल्या डोक्यावर केस असणं फार महत्त्वाचं आहे. पण सध्या केस गळतीचं प्रमाण वाढलेलं पाहायला मिळत आहे.

केस गळतीच्या समस्या आपल्या आजुबाजुला भरपूर पहायला मिळत असतात. परिणामी ते डाॅक्टरचा सल्ला घेतात तर कधी विविध उपाय करतात. धकाधकीच्या जीवनात पुरूष आणि स्त्री या दोन्हींना केस गळतीच्या समस्या आहेत. स्त्रीयांच्या केसगळतीवर अनेक उपाय सांगितले जातात पण पुरूषांना सुद्ध सध्या या उपचारांची गरज आहे. हळूहळू टाळूवरील केस गायब होणे, माघे सरकत चाललेली हेअर स्टाईल ही समस्या बनली आहे.

20 ते 30 वयोगटातील केसगळतीचा माहितीपुर्ण व्हिडीओ डाॅ किरण यांनी शेअर केला आहे. आहारात वाढलेली साखर मग ती अन्नामध्ये आसो वा अन्नप्रक्रियेमध्ये असो या कारणानं केस गळती संभवते. वाढलेलं उच्च-ग्लायसेमिक आहार यामुळं इन्सुलिन प्रतिरोध होवू शकतो आणि केस गळती होते. व्हिटॅमिनची कमी आणि प्रोटीन पावडर देखील केस गळण्यास कारणीभूत आहे.

दरम्यान, केसगळतीच्या समस्येनं सध्या बहुतांश युवकांना घेरलं आहे. परिणामी आपण यावर लवकर उपाय करणं गरजेचं आहे. जास्त केस गळत असतील तर वेळीच डाॅक्टरांचा सल्ला घ्या आणि आवश्यक त्या उपचारांनी आपल्या केसगळतीकडं लक्ष द्या.

थोडक्यात बातम्या 

“भाजप व्हायरसविरोधात ममता बॅनर्जी नावाची लस प्रभावी”

‘मी आणि समीर दोघेही हिंदू आणि आम्ही…’; क्रांती रेडकरचं मलिकांना प्रत्युत्तर

समीर वानखेडेंना मोठा धक्का! ‘या’ प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने याचिका फेटाळली

“गरिबाच्या घरचे दिवे विझवून शनिवारवाड्याचे दिवे पेटवण्याचा प्रयत्न केलाय”

अन् भर कार्यक्रमात पुरूषाने चक्क गव्हर्नरच्या कानशिलात लगावली; पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More