बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! जीव वाचवताना हात सुटला, खाली पडून रहिवाशाचा मृत्यू

मुंबई | मुंबईतील करी रोड परिसरात एका साठ मजली इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. या इमारतीमध्ये 19 व्या मजल्यावर आग लागली. आगीनंतर इमारतीतून जीव वाचवण्याचा प्रयत्न करणारा एक रहिवासी बाहेर लटकत होता. मात्र त्यानंतर जे झालं त्यांने सर्वांच्या काळजाचा ठोका चुकेल.

दुपारी 12 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. 19 व्या मजल्यावर आग लागल्यानंतर दुरुन आगीचे लोट आणि काळसर धूर दिसत होता. यावेळी इमारतीत मोठा गोंधळ उडाला होता. तसेच सर्वचजण आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी एक जण बालकनीत गेला आणि तिथून तो थेट खाली कोसल्याची माहिती समोर आली आहे.

अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर ताबा मिळवण्याचे प्रयत्न केले जात होते. आग नेमकी कुठल्या कारणामुळे लागली, ती कशी पसरली, याविषयी माहिती अद्याप समोर आलेली नाही.

दरम्यान, अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र सुदैवाने कुठल्याही जीवितहानीचं अद्याप वृत्त नाही.

थोडक्यात बातम्या-

लालबागमधील सर्वात उंच इमारतींपैकी एक ‘वन अविघ्न पार्क’ला भीषण आग!

एनसीबीची धडक कारवाई; अजून एका ड्रग पेडलरला घेतलं ताब्यात

शिल्पा शेट्टीचा नवा हेअर कट चर्चेत, पाहा व्हिडीओ

“तू ये बता की अनिल देशमुख कहा है और मुख्यमंत्री मंत्रालय कब जायेगें”

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे 10 मुद्दे, वाचा एका क्लिकवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More