बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘झारखंड सरकार पाडण्यात केंद्रासह महाराष्ट्रातील भाजपच्या ‘या’ नेत्याचा हात’; राष्ट्रवादीेचा आरोप

मुंबई | केंद्र सरकार झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातून भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे हे आमदार फोडण्यासाठी झारखंडला गेले होते, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

महाराष्ट्र राज्यात पूरस्थिती असताना केंद्र सरकार झारखंड सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. झारखंड पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये बावनकुळे यांच्यासह भाजप नेते मोहित कंबोज यांचं नाव असल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

अभिषेक दुबे या पत्रकाराला अटक केल्यानंतर त्याच्या पोलीस चौकशीतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा पत्रकार तीन आमदारांच्या संपर्कात होता. महाराष्ट्रातील माजी मंत्री डील करण्यासाठी गेले असल्याचा आरोप पत्रकाराने केला आहे. 21 जुलैला भाजपचे महाराष्ट्रातील पदाधिकारी मोहीत कंबोज, अमुत यादव आणि आशुतोष ठक्कर हे लोक पैसे घेऊन गेले होते. मात्र पोलिसांना यांची माहिती मिळाल्याचं समजताच त्यांनी पळ काढल्याचं मलिक म्हणाले.

दरम्यान, काँग्रेसच्या आमदारांना 50 कोटी आणि मंत्रिपदाची ऑफर होती. हे पैसे पुरग्रस्तांना आले असते मात्र झारखंड सरकार पाडण्यासाठी भाजप यंत्रणा काम करत असल्याचा दावा मलिकांनी केला आहे. यावर भाजपची काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

राज कुंद्राच्या अडचणीत वाढ, पोलिसांना ऑफिसमध्ये सापडली धक्कादायक गोष्ट!

‘बदनामीला घाबरू नकोस…’; चिपळूणमधील त्या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी भास्कर जाधवांना दिला सल्ला

सिनेसृष्टीवर शोककळा! ज्येष्ठ अभिनेत्री जयंती यांचं निधन

आईच्या अंगावर कुत्रा भुंकला, तरुणीला बेदम मारहाण; पुण्यातील धक्कादायक घटना!

जाधवांचा आवाजच ‘राउडी राठोड’सारखा आहे; चिपळूणमधील ‘त्या’ महिलेची प्रतिक्रिया

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More