बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“माझ्या पराभवामागे ‘या’ नेत्याचा हात; मोठं षडयंत्र रचुन मला पाडलं”

सातारा | राज्याच्या सहकाराचा केंद्रबिंदू म्हणून राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बॅंकांना (Co-Operative Banks) ओळखण्यात येतं. नुकतंच विविध जिल्हा बॅंकांच्या निवडणुकांचा निकाल घोषित झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाची सहकारी बॅक म्हणून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला (Satara District Bank) ओळखण्यात येतं. सातारा जिल्हा बॅंकेवरून राज्यात जोरदार राजकीय कलगीतूरा रंगला आहे.

सातारा बॅंकेच्या निवडणुकीत साताऱ्यातील राष्ट्रवादीचे दिग्गज नेते शशिकांत शिंदे यांना अवघ्या एका मतानं पराभूत व्हावं लागलं आहे. शिंदे यांना त्यांच्याच गडात सलग दुसऱ्यांदा पराभव पत्करावा लागला आहे. परिणामी शशिकांत शिंदे यांच्या पराभवास कारणीभूत व्यक्तींवर शिंदे यांनी जोरदार टीका केली आहे.

साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी मला पाडण्यासाठी षडयंत्र रचलं होतं, असा गौप्यस्फोट शिंदे यांनी केल्यानं राज्यात खळबळ माजली आहे. आमदार शिवेंद्रराजे यांनीच माझ्या पराभवासाठी काम केलं, असं शिंदे म्हणाले आहेत. साताऱ्याच्या राजकारणात शशिकांत शिंदे आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यात खुपदा राजकीय वाद निर्माण झाला आहे.

दरम्यान, सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निकालात दिग्गजांना पराभवाचा झटका बसला आहे. शशिकांत शिंदे यांच्या पराभवानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात शिंदे यांची भेट घेतली होती.

थोडक्यात बातम्या 

“…तोपर्यंत दाढीतून घरं पडत राहतील, मोदींची दाढी आणि पीएम आवास दोन्ही अमर आहेत”

आता पहिली ते सातवीच्या शाळांचीही घंटा वाजणार, सरकारचा मोठा निर्णय

“साखरेला चांगला भाव मिळतोय, आमच्या ऊसाचा भावही वाढवा”, राजू शेट्टींचा एल्गार

अण्णा हजारेंची तब्येत बिघडली, पुण्यातील रुग्णालयात दाखल

पोलिसाला लाच घेताना पकडण्यासाठी स्वतः आमदारच बनला ट्रकचालक, पाहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More