बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

UPSC Result | शेतकरी बापाचे कष्ट फळाला आले; सोलापूरचे शुभम जाधव साहेब झाले

सोलापूर | केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात यश संपादन केलं आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगानं 752 उत्तीर्ण उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. यात महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं प्रमाण जास्त आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी पुत्रानं आपली मोहर युपीएससीच्या निकालावर उमटवली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर भागातील शिंदेवाडी गावातील शेतकरी पांडूरंग जाधव यांचा मुलगा शुभम जाधव यांनं बापाच्या कष्टाचं चिज केलं आहे. शुभम जिद्दीच्या जोरावर युपीएससी परिक्षा उत्तीर्ण झाला आहे. शुभमला गेली 4 वर्ष झालं युपीएसससीच्या अंतीम निकालात स्थान मिळवता येत नव्हतं. पण शेवटी आपल्या अभ्यासाच्या जोरावर शुभमला यश मिळालं आहे.

शुभम जाधव यानं 445 वा क्रमांक मिळवला आहे. गेली 4 परिक्षांमध्ये शुभम मुलाखतीपर्यंत जाऊन आला होता. शिंदेवाडीत शिक्षण झालेला शुभम आपल्या जिद्दीच्या बळावर अखेर भारतीय पोलीस सेवेत निवडला जाण्याची शक्यता आहे. पुण्यात राहून शुभमनं आपली तयारी केली आहे.

पुण्यातील नामांकित फर्ग्युसन काॅलेजात शुभमनं आपली बीए ची पदवी अर्थशास्त्र विषयामध्ये पुर्ण केली आहे. पदवीपासुनच शुभमनं तयारी केली. शुभमच्या या यशानं शेतकरी कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे.

थोडक्यात बातम्या 

UPSC Result | लातूरच्या पूजा कदमने अंधत्वावर मात करत युपीएससीत मिळवलं यश

मुंबई विमानतळावर ‘इतके’ हजार प्रवासी आढळले कोरोना पॉझिटिव्ह

परिवहनमंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ; ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावलं

मराठवाड्याच्या निलेशची UPSC मध्ये गगनभरारी, सलग दुसऱ्यांदा मिळवलं यश

“सरकार चालवता येत नसेल तर खुर्च्या उबवायचं काम करु नका, राजीनामा द्या”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More