बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ट्विटरवर होतोय ‘आज का रावण नरेंद्र मोदी’ हा हॅशटॅग ट्रेंड’; तब्बल एवढ्या लोकांनी केलंय ट्विट

नवी दिल्ली | आज देशात सर्वत्र विजयादशमी म्हणजे दसऱ्याचा सण उत्साहात साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या रुपाने वाईट विचारांचे, गोष्टींचे दहन केले जाते. मात्र दसऱ्याच्या दिवशी सोशल मीडियावर एक वेगळंच वार वाहत असल्याचं समोर आलंय.

दसऱ्याच्या दिवशी ट्विटरवर मात्र एक वेगळाच हॅशटॅग ट्रेंड होत असल्याचं दिसून आलंय. ट्विरटरवर ‘आज का रावण नरेंद्र मोदी’ हा हॅशटॅग जबरदस्त ट्रेंड केला जात आहे. आत्तापर्यंत 103 हजार लोकांनी हा हॅशटॅग वापरून ट्विट केली आहेत.

 

Photo Courtesy-Twitter

 

या ट्विट्समध्ये नेटकऱ्यांनी लखीमपूर हिंसाचार,शेतकरी आंदोलन, एअर इंडियाचं खासगीकरण यांसारख्या अनेक घटनांचे दाखले देत नरेंद्र मोदी यांना ट्रोल केलं आहे. नेटकऱ्यांनी या ट्विट आणि हॅशटॅगच्या माध्यामातून एकप्रकारे आपला रोष व्यक्त केला आहे. त्यामुळे नरेंद मोदी आणि पक्षासाठी ही एक धोक्याची घंटा आहे.

ट्विटर हे आजकाल मत व्यक्त करण्यासाठी अधिकृत माध्यम समजलं जातं. बॉलिवूड कलाकांरापासून, राजकीय व्यक्ती ते सामान्य जनता प्रत्येक व्यक्ती ट्विटरवर आपलं मत व्यक्त करताना दिसतात. त्यामुळे ट्विटरवर ट्रेंड झालेल्या गोष्टींकडे तेवढंच गांभीर्याने पाहिलं जातं. त्यातच मोदींच्या नावाने ट्रेंड झालेला हा हॅशटॅग नरेंद्र मोदी यांच्यासोबतच भाजपच्याही अडचणी वाढवणारा ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

“बेईमान धोरणाची पालखी वाहणारे सूर्याजी पिसाळ आजही महाराष्ट्रात निपजत आहेत”

“गोव्यात जिंकणारा पक्ष लोकसभेतही विजयी होतो, आम्ही दोन्ही ठिकाणी बाजी मारू”

‘गर्व से कहो हम हिंदू है’; शिवसेना भवनासमोर पोस्टरबाजी करत मनसेनं सेनेला डिवचलं

पालिका निवडणुकांच्या तोंडावर शरद पवार पिंपरी चिंचवड दौऱ्यावर!

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये भररस्त्यात तुफान हाणामारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More