बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अंधश्रद्धेचा कहर ! कोरोना रोखण्यासाठी 7 लाखांची पुजा, खंडीभर बोकडांचे बळी अन्…

यवतमाळ | यवतमाळ पासून 70 किमी अंतरावर आनंदवाडी आहे. तिथल्या रहिवासींची अंधश्रध्दा आहे की या गावातील लोकं देवीच्याच कृपेने आनंदी आहेत. या गावात कोरोना होऊ नये म्हणून खंडीभर बोकडांचे बळी दिले गेले. गावात एकही कोरोना रूग्ण नाही असं इथले लोक छातीठोकपणे सांगतात. देवीच्या सवारीनं लोक ना मास्क लावतात ना लस घ्यायला जातात. गावात प्रत्येकाच्या देवघरात चांदीची महाकाली आहे. देवीच्या सवारीमुळे कोरोना होणारच नाही अशी गावकऱ्यांची अंधश्रध्दा आहे.

‘आम्ही दवाखाण्यात कधीच जात नाही. कोयता लागला, साप चावला तरी जंगलातील औषधी लावतो’, असं ग्रामस्थ मनोज चव्हाण यांना सांगितलं आहे. कर्मचारी गावात तपासणीसाठी आले होते. मात्र, लोकांनी सहकार्य न केल्यानं फक्त 17 चाचण्या करून त्यांना परत जावं लागलं. त्यामुळं प्रशासनाकडं या गावातील कोरोनाचे रूग्ण आणि कोरोनाने मृत पावलेल्या रूग्णांचा आकडा नाही.

आनंदवाडीत शहरातून किंवा दुसऱ्या गावातून येणाऱ्यांना प्रवेशबंदी आहे. मात्र, गावात लग्न सोहळे धूमधड्याक्यात सुरू आहेत. या वर्षी गावतल्याच मुला-मुलींची लग्न लावून दिली आहेत, अशी 20 लग्न झाली असल्याचं गावकरी सांगतात. गाव प्रवेशबंदीमुळं 17 जोडप्यांचे विवाह गावातल्या गावातच लागले आहेत. त्यातही या विवाहसोहळ्यांमध्ये एकाही व्यक्तीनं मास्कचा वापर केला नव्हता.

दरम्यान, ‘आतापर्यंत गावानं 7 लाखांच्या पूजा घातल्या आहेत. भक्तांच्या अंगात देवीची सवारी आली. तिनं सांगितलं की, आम्हाला कोरोना होणार नाही’, असं गावातील गावकरी मनोज चव्हाण यांनी सांगितलं आहे. ‘लोकांमध्ये अंधश्रध्दा आहे, गैरसमज आहेत, ते आरोग्य यंत्रणेला सहकार्य करत नाही. तपासणीच्या धाकोनं शेतात पळून जातात. तरीही आम्ही सरपंच आणि आशा सेविकांच्या मदतीनं समुपदेशन करत आहेत’, अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या

“मोदी दिलदार आहेत, गुजरातला 1000 कोटी दिले, महाराष्ट्राला 1500 कोटी देतील”

‘…हे तर आत्मघातकी सरकार’; कोकण दौऱ्यात फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

कोरोनामुक्त झाल्यावर शारीरिक संबंध ठेवावे की नाही?, तज्ज्ञांनी दिला हा महत्वाचा सल्ला

‘मी काय भाजपचा ठेका घेतला नाही’; खासदार संभाजीराजे आक्रमक

नांदेडमध्ये माणुसकी मेली, पैसे उकळण्यासाठी मृत कोरोना रुग्णावर तीन दिवस उपचार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More