सातारा | माणुसकील काळीमा फासणारा प्रकार महाबळेश्वरमध्ये घडला आहे. एका मुख्यध्यापकानेच दहावीतील मुलीवर बलात्कार केल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे. दिलीप रामचंद्र ढेबे असं संंबंधित मुख्यध्यापकाचं नाव आहे. ज्यांच्याकडे पालक विश्वासाने आपल्या मुलांना पाठवतात तेच शिक्षक अशा उलट्या काळजाचे निघाले तर अवघड आहे.
दहावीत शिकत असलेल्या आपल्या जवळच्या नात्यातील मुलीवर दिलीप रामचंद्र ढेबे या मुख्याध्यापकाने 15 वर्षीय मुलीवर शाळेच्या प्रयोग शाळेत आणि हॉलमध्ये अनेकवेळा जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत अत्याचार केला. यासंबंधी एका जागृक नागरिकाने चाईल्ड हेल्पलाईन 1098 वर तक्रार दाखल केली होती. त्यानंतर महाराष्ट्र पोलिसांकडे आलेली तक्रार महाबळेश्वर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली.
गेल्या पाच दिवसांपासून महाबळेश्वर पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. त्यानंतर पोलिसांनी आपली सुत्र फिरवत आरोपी आणि पीडितेचा पत्ता पोलिसांनी काढला. पीडितेला विश्वासात घेतलं आणि तिच्यावर होत असलेल्या अत्याचाराविषयी सांगितलं. मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी मुख्याध्यापवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर झालेल्या चौकशीत मुख्याध्यापकाने गुन्ह्याबद्दल कबुली दिली.
दरम्यान, महाबळेश्वर पोलिसांनी मुख्याध्यापकाला अटक केली आहे तर महाबळेश्वर पोलीस निरिक्षक बी. ए. कोंडुभैरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या बलात्कार प्रकरणाचा तपास करत आहेत.
थोडक्यात बातम्या-
खासदार नुसरत जहाँ यांच्या ‘त्या’ खास टॅटूची सोशल मीडियावर जोरदार चर्चा
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता येणार, वैज्ञानिकांनी विकसित केले नवे उपचार!
लस देण्यासाठी नर्सने हात लावला की पोलीस कर्मचाऱ्याला आवरेना हसू, पाहा व्हिडीओ
प्रेम आंधळ असतं! 40 वर्षाची 4 मुलांची आई 20 वर्षाच्या प्रियाकरासोबत झाली फरार अन्…
गरुड भरारी घेण्याची शक्ती तुमच्या सदिच्छांमुळेच- राज ठाकरे
Comments are closed.