बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

18 वर्षांवरील लसीकरणाबाबत आरोग्यमंत्र्यांनी केलं ‘हे’ मोठं वक्तव्य

मुंबई | महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या ही दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात लॉकडाऊनची घोषणा केली. केंद्र सरकारने 1 मे 2021 पासून 18 वर्षाच्यावरील नागरिकांचं सरसकट लसीकरण करणार असल्याचं घोषित केलं. पण लसींअभावी महाराष्ट्रात 1 तारखेपासून सर्वांना लस देणे शक्य नसल्याचं सरकारने स्पष्ट केलं.

आता महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबत महत्त्वाचं आणि मोठं वक्तव्य केलं आहे. राज्यात 18 वर्षांच्यावरील नागरिकांच्या लसीकरणाला 15 मे नंतर सुरुवात केली जाईल. अशी माहिती गुरुवारी माध्यमांशी बोलताना आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.

विभागीय आयुक्त व राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. तसेच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणची माहिती जाणून घेतली. या बैठकीनंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधत 15 मे नंतर लसीकरणाला सुरुवात होईल, असं सांगितलं.

दरम्यान केंद्र सरकारने केलेल्या सूचनेनुसार भारत बायोटेक आणि सीरमने राज्य सरकारला लस देण्याचा दर हा कमी करण्याचं घोषित केलं आहे. भारत बायोटेकने 200 रुपये तर सीरमने 100 रुपये लसीचा दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यांना काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळणार असल्याचं यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बोलून दाखवलं.

थोडक्यात बातम्या-

बाबो! …अन् चालू मॅचमध्ये सूर्यकुमार यादवने केलं पत्नीला किस

“धोनीनंतर मराठमोळा ऋतुराज गायकवाड होऊ शकतो चेन्नईचा कर्णधार”

धक्कादायक! टिव्ही पाहायला गेलेल्या 5 वर्षीय मुलीवर तरुणाने केला बलात्कार

प्रसिद्ध अभिनेत्रीने केली भावाची हत्या, कारण अत्यंत धक्कायदायक

रेमेडेसिविर इंजेक्शनचे दुष्परिणाम उघड; ‘या’ जिल्ह्यात इंजेक्शनचा वापर थांबवण्याचे आदेश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More