बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिंदे सरकारचं भवितव्य आज ठरणार?, चार याचिकांवर सुनावणी होणार

मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या महिन्यात झालेला सत्तापालट आपण सर्वांनी पाहिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी(Eknath Shinde) शिवसेनेचे फुटीर आमदार घेऊन भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. तेव्हापासून शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात सतत टोलेबाजी सुरु असते. त्यातच खरी शिवसेना(Shivsena) कोणाची हा वाद न्यायालयात पोहोचला होता. आता या वादासह इतर चार याचिकांवर बुधवारी सर्वाेच्च न्यायालयात( Supreme court) सुनावणी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एकूण 16 आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईला आव्हान, राज्यपालांनी उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) सरकारला विश्वासमताबाबत दिलेल्या निर्देशांना आव्हान, शिंदे गटाला शिवसेनेचे नाव देण्याचा आक्षेप, एकनाथ शिंदेंच्या शपथविधीला आणि अधिवेशनाला आक्षेप,या चार याचिकांवर सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे.

आजच्या सुनावणीवर सरकारचं भवितव्य अवलंबून आहे. 16 आमदारांना अपात्र ठरवल्यास राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळू शकतं. आणि जर शिंदे गटाच्या बाजूने निकाल लागला तर या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तारित होऊ शकतो. तसेच ठाकरेंचं अस्तित्व यावर अवलंबून असल्याच्या देखील चर्चा आहेत. त्यामुळे दोन्ही गटासाठी हा निर्णय महत्वाचा आहे.

20 जुलैपासून शिवसेना आणि शिंदे गटाने दाखल केलेल्या चार याचिकांची सुनावणी मुख्य न्यायमुर्ती एन.व्ही. रमना( N.V. Ramana) न्यायमूर्ती कृष्णाम मुरारी, न्यायमुर्ती हेमा कोहली यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. गेल्या वेळी कोणत्याही बाजूच्या आमदारांना अपात्र ठरवू नका, जैसे थे परिस्थिती ठेवा, असा आदेश न्यायालयाने दिला होता. आता न्यायालय यावर काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘संजय राऊत आले आणि सगळं फिसकटलं’, बंडखोर आमदाराचा मोठा गौप्यस्फोट

संजय राऊतांना न्यायालयाचा दणका, ईडी कोठडीतील मुक्काम वाढवला

‘सगळेच दिवस सारखे नसतात दिवस फिरतात, त्यामुळे…’, उद्धव ठाकरे भाजपवर बरसले

“चाळीस ते चाळीस जागांवर निवडणुका होऊ द्या, मग बघूयात सत्ता जिंकतेय की सत्य”

“सद्यस्थितीत कोणताही पक्ष भाजपला पराभूत करू शकत नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More