बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ही’ अभिनेत्री लवकरच करणार कमबॅक; दाऊदसोबतच्या संबंधांमुळे आली होती चर्चेत

मुंबई | बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांचा पदार्पण जोरदार होत असतो. त्यातच एक अभिनेत्री म्हणजे मंदाकिनी. त्या पुन्हा बॉलिवूडमध्ये परतणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. आपल्या अभिनयानं एकेकाळी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी अभिनेत्री म्हणून मंदाकिनीचं नाव घेतलं जातं.

मंदाकिनीचे मॅनेजर बाबूभाई थिबा यांनी सांगितलं की, त्या सध्या काही स्क्रिप्ट वाचत आहेत. चित्रपटांव्यतिरिक्त, त्या वेब सीरिजमध्ये काम करण्यासही इच्छूक आहेत. मात्र त्यांना मोठी भूमिका हवी आहे. मंदाकिनी पुन्हा अभिनयामध्ये परत येऊ इच्छित नव्हत्या. त्यांचा भाऊ भानूनेच त्यांना परत बॉलिवूडमध्ये पुनराआगमन करण्याची विनंती  केली आहे.

मंदाकिनी यांनी 1985 मध्ये ‘राम तेरी गंगा मैली ’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटानंतर मंदाकिनी यांचा भरपूर चाहता वर्ग निर्माण झाला. परंतु त्यांचं हे यशस्वी करिअर फार काळ टिकू शकलं नाही. या चित्रपटामध्ये त्यांनी अनेक बोल्ड सीन्सही दिले आहेत. यामध्ये त्या एका पांढऱ्या साडीमध्ये धबधब्याखाली एक सीन शूट करण्यात आला होता. आजही त्या सीनची जोरदार चर्चा होताना दिसते.

दरम्यान, मंदाकिनी यांच नाव अंडरवल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी जोडलं गेलं होत. खरंतर दाऊद इब्राहिम आणि मंदाकिनी यांचे काही फोटो मीडियासमोर आले होते. असं म्हणतात की, दाऊदला मंदाकिनी यांच्या सौंदर्याने वेड लावलं होतं. पण हे नात फार काळ टिकू शकलं नाही.

थोडक्यात बातम्या – 

अथिया-राहुलच्या नात्यावर सुनील शेट्टीनं दिली प्रतिक्रिया, म्हणाला…

काॅमेडी किंग जाॅनी लिव्हर लावणार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर हजेरी

“ठाकरे सरकार हँग झालंय त्यामुळे निकालाची वेबसाईट ‘हँग’ली तर नवल काय?”

“मोदींनी कौतुक केलं म्हणून योगी सरकारचं अपयश लपत नाही”

“आम्ही वाट पाहतोय सभ्य शेजारी बनून राहण्याची पण आरएसएची विचारसरणी मध्ये आली”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More