बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अफगाणिस्तानात अडकलेल्या नागरिकांसाठी पाठवलेल्या विमानाचं अपहरण

काबुल | अफगाणिस्तानमध्ये तालिबाननी ताबा घेतल्यानंतर तेथील नागरिकांबद्दल जगभरातुन चिंता व्यक्त केली जात आहे. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सर्व देश प्रयत्न करत आहेत. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी पाठवलेल्या युक्रेन देशाच्या विमानाचं रविवारी अपहरण करण्यात आलं आहे. युक्रेन देशाचे उपपरराष्ट्रमंत्री येवगेनी येनिन यांनी याबाबत माहिती दिली आहे.

युक्रेन देशाने अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी विमान पाठवलं होतं. परंतु त्या विमानाचं अज्ञात व्यक्तीनी रविवारी अपहरण करून ते विमान मंगळवारी इऱाणला नेण्यात आलं आहे. तसेच युक्रेन या देशातील नागरिकांची सुटका करण्यासाठी गेलेले अजूनही काही विमान अफगाणिस्तानमध्ये अडकून असल्याची माहिती येवगेनी येनिन यांनी दिली आहे.

मात्र अपहरण केलेल्या विमानाचे दावे इराणने खोडून काढले आहेत. इराणचे मंत्री अब्बास असलानी यांनी सांगितलं आहे की, युक्रेनचे विमान मशहद विमानतळावर उतरलं होतं. त्यानंतर ते विमान इंधन भरून युक्रेनच्या दिशेला रवाना झाले. त्या पुढची माहिती आम्हाला माहित नाही.

दरम्यान, काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार त्या विमानाचं अपहरण कोणी केलं आहे, ते अजून काही कळू शकलं नाही. मात्र त्या विमानाचा ताबा काही हत्यारबंद लोकांनी घेतला होता. आतापर्यंत अफगाणिस्ताममधून 83 लोकांची सुटका करून आणली आहे. तसेच अजूनही 100 नागरिक अडकून असल्याची माहिती दिली आहे.

 

थोडक्यात बातम्या-

फक्त 1 कोटी…’; चाहत्याच्या मागणीवर सोनू सूदचं हटके उत्तर

राणेंच्या विरोधात शिवसैनिकांनी काढला कोंबडी मोर्चा

“तुमच्या घरात घुसून हिशोब चुकता करेल”, पाहा व्हिडीओ

करिश्मा तन्ना आणि करण बोहरा यांनी दिली ‘बिग बाॅस’वर प्रतिक्रिया, पाहा व्हिडीओ

केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर शरद पवारांंचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More