बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारतीय खेळाडूची ऐतिहासिक खेळी; टी-20 मध्ये ठोकलं धुवाधार द्विशतक

मुंबई | भारतात क्रिकेटबद्दल मोठ्या प्रमाणात क्रेझ आहे. भारतात मोठमोठ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. अशाच प्रकारच्या मोठमोठ्या लीगमुळे भारताला मोठमोठे फलंदाज मिळाले आहेत. रिषभ पंत, युवराज सिंग, रोहित शर्मा यांसारख्या खेळाडूंनी टी 20 फाॅरमॅटमध्ये रंगत आणली. त्यातच आता आणखी एका खेळाडूने भारतीय संघाचे दरवाजे खटखटले आहेत. एका भारतीय खेळाडूने एक नवा इतिहास घडवला आहे.

दिल्लीचा क्रिकेटर असलेल्या सुबोध भाटीने टी-20 सामन्यात दुहेरी शतक ठोकून सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. सुबोध भाटीने 79 चेंडूत नाबाद 205 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीमध्ये 17 षटकार आणि 17 चौकार खेचले. सुबोध भाटीने टी-20 क्लब मॅचमध्ये सिम्बा विरुद्धच्या सामन्यात हा पराक्रम केला आहे. त्यानं सिम्बा संघाच्या गोलंदाजांचा घाम काढला. त्याच्या या शतकीय खेळाच्या 20 षटकात 265 धावांचा डोंगर उभारला.

कोरोनामुळे मागील काही काळापासून क्रिकेट स्पर्धेचे आयोजन रद्द करण्यात आलं होतं. त्यानंतर आता भारतातील घरगुती क्रिकेटला लवकरच सुरवात होईल. बहुप्रतिक्षित रणजीचे सामने 16 नोव्हेंबर 2021 ते 19 फेब्रुवारी 2022 दरम्यान रंगणार आहे. त्यानंतर 23 फेब्रुवारी ते 26 मार्च 2022 दरम्यान विजय हजारे ट्रॉफी खेळली जाईल.

दरम्यान, सुबोध भाटीच्या दमदार कामगिरीमुळे त्यानं आता भारतीय संघाचं आणि आयपीएलचे दार खटखटले आहेत. भारताचा तरूण संघ म्हणजेच B टीम सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. त्यात अनेक नवीन खेळाडूंना संधी देखील देण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या –

स्वत:ला हिंदू नाही तर भारतीय म्हणा, सगळ्यांचा DNA एकच- मोहन भागवत

पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात; सरकार मांडणार ‘हे’ 3 मुख्य प्रस्ताव

मी आणखी 25 वर्षे तरी राजकारणात राहणार- देवेंद्र फडणवीस

‘दिरंगाईचा खेळ कायमचा थांबवा’; अमित ठाकरे संतापले

चिंता वाढली! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More