बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गीता समोताची ऐतिहासीक कामगिरी; आफ्रिकेतील 16000 फूट उंच किलीमंजारो शिखर केला सर

मुंबई | गिर्यारोहन करणं म्हणजे अदम्य साहस आणि धाडस लागतं. या साहसाच्या जोरावर जगातील उंच ते अती उंच पर्वत रांगा पार करण्यात येतात. आपल्या देशातील पुरूषांसोबतच महिला पण या पर्वत रांगा पार करत असतात. आफ्रिका खंडातील सर्वात उंच पर्वत सर करण्यात गीता समोता यांनी यश मिळवलं आहे.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलमध्ये कार्यरत असलेल्या गीता समोतानी मोठी मोहीम फत्ते केली आहे. गीता समोता या आफ्रिकेतील किलीमांजारो पर्वत सर्वात जलद सर करणाऱ्या महिला ठरल्या आहेत. किलीमांजारो पर्वताची उंची 5895 मीटर आहे. या पर्वतावर भारतीय झेंडा फडकावून गीता यांनी आपला आनंद साजरा केला.

किलीमांजारो हा पर्वत अनेक वैशिष्ट्यपुर्ण गोष्टींसाठी ओळखला जातो. हा जगातील महत्वाच्या पर्वतांमध्ये गणला जातो. जगातील सर्वात उंच मुक्त पर्वत आहे आणि किलिमंजारो पर्वताच्या शिखरावर तीन ज्वालामुखी शंकू आहेत. किलीमंजारो शिखर हे पृथ्वीवरील चौथ्या क्रमांकाचे महत्त्वाचं स्थान मानलं जातं. हे सर करण्यात भारतीय कन्येला यश मिळाल्याने देशात आंनदाचे वातावरण आहे.

किलीमांजारो सर केल्यानंतर गीताने आपल्या भावना व्यक्त केल्या ती म्हणाली की, स्वतःवर विश्वास ठेवा आणि जगाला तुमच्या कर्तृत्वाची जाणीव करून द्या. महिलांची शक्ती आफ्रिकेच्या शीर्षस्थानी चमकत आहे. या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

थोडक्यात बातम्या 

इंग्लडच्या ‘या’ 3 धडाकेबाज खेळाडूंनी घेतली आयपीएलमधून माघार!

आवरा रे कोणीतरी! महिला पुरूषाच्या पाठीवर बसली अन्…; व्हिडीओ पाहून तुम्हीही हसाल पोट धरून

‘मुख्यमंत्र्यांनी थोबाडीत मारली तरी सत्ता सोडणार नाही’; चंद्रकांत पाटलांकडे राज्यातील मंत्र्याचा गौप्यस्फोट

दिलासादायक! राज्यातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा घटला, वाचा आकडेवारी

मला आता जेलमधून सोडू नका, मला इथंच मरु द्या- मनोहर मामा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More