महाराष्ट्र मुंबई

तेजस्वी सातपुते यांनी पोलीस दलासाठी घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय; गृहमंत्र्यांनीही केलं कौतुक

मुंबई | सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलीस दलासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला होता. सातपुते यांच्या निर्णयाचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वागत करत कौतुक केलंय.

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलीसांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना किमान त्यांचा वाढदिवस त्यांचे कुटुंबीयासमवेत साजरा करता यावा, यासाठी त्यांना एकदिवस निश्चित सुट्टी देण्याचा निर्णय पोलीस अधीक्षकांनी घेतला.

या निर्णयामुळे कामकाज तणावरहीत होईल आणि पोलिसांना त्यांच्या कुटुंबीयांसोबत एक आनंदाने दिवस साजरा करता येईल, असं सातपुते यांचं मत आहे.

अनिल देशमुख यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन तेजस्वी सातपुते यांचा निर्णय कौतुकास्पद असल्याचं म्हटलंय.

 

थोडक्यात बातम्या-

भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल!

शेतकरी मागणीवर ठाम; थंडी-पावसातही शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु

मेहबूब शेख यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार देणारी तरुणी गायब!

….म्हणून त्याने भररस्त्यावर गर्लफ्रेंडवर गोळी झाडून नंतर स्वत: आत्महत्या केली; मुंबईतील घटनेने खळबळ

शिवसेनेचा आणखी एक नेता ‘ईडी’च्या रडारवर?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या