बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन् अचानक पानघोड्याने पाण्यात सुरू केला बोटीचा थरारक पाठलाग; पाहा व्हिडीओ

झांबिया | सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही मजेशीर असतात. काही व्हिडीओ खुपच धक्कादायक असतात. तर काही व्हिडीओ असे असतात, त्यांना पाहिल्यांवर आपल्या अंगावर काटाच येतो. सध्या सोशल मीडियावर अनेक पशु-पक्षांचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. अशातच पाणघोडा या दिसायला शांत असणाऱ्या प्राण्याने अचानक रौद्र रूप धारण केलेलं पाहायला मिळालं.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये पाणघोडा एका बोटीचा थरारकपणे पाठलाग करताना दिसत आहे. बोटीमध्ये बसलेल्या माणसांवर हल्ला करण्याचा तो प्रयत्न करत आहे. पाणघोडा रागात असल्याचं दिसत आहे. तो समोर असलेल्या बोटीचा पाठलाग करतोय.

या बोटीतील लोक पाणघोड्याची शुटिंग करण्यासाठी पाण्यात उतरले होते. मात्र, यावेळी पाणघोड्याने त्यांना पाहिले आणि त्याने थेट त्यांचा पाठलाग सुरु केला.

दरम्यान,  आयएफएस ऑफिसर सुधा रामेन यांनी शेअर केला असून तो एका पाणघोड्याचा आहे. हा व्हिडीओ झांबिया येथील असल्याचं सांगितलं जात आहे. बोटीत बसलेले लोक पाणघोड्यापासून स्वत:चे संरक्षण करण्यात यशस्वी ठरले. मात्र पाणघोड्यापासून नेहमी लांब राहिलं पाहिजे असे या व्हिडीओच्या निमित्ताने आवर्जून सांगितलं जात आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

शाब्बास पुणेकरांनो! कोरोनामुक्तीच्या दिशेने पुणेकरांचं पहिलं पाऊल, वाचा आजची दिलासादायक आकडेवारी

दिलासादायक! मुंबईतील कोरोना आटोक्यात; कोरोनामुक्तीचा दर पोहोचला 95 टक्क्यांवर

प्रेरणादायी! घरी राहून 99 वर्षाच्या आजीनं केली कोरोनावर मात, नातू म्हणाला…..

…तर 2024 मध्ये काँग्रेस स्वबळावर सत्तेत येईल- नाना पटोले; काँग्रेसचा स्वबळाचा नारा!

महाराष्ट्रातील अनलॉकवरून ठाकरे सरकारचा घुमजाव; अनलॉकच्या श्रेयावरून चढाओढ?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More