बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नवरा-बायकोनं केक कापला, पुढं पोलीस आले अन् जेलमध्ये टाकलं, कारण धक्कादायक

औरंगाबाद | औरंगाबादमध्ये एका दांपत्यांनी अतिशय वेगळ्या पद्धतीनं लग्नाचा वाढदिवस साजरा केला. मात्र हा वाढदिवस त्यांना चांगलाच महागात पडला. लग्नाचा वाढदिवस म्हटलं की पती आपल्या पत्नीसाठी काय करेल याचा नेम नाही. औरंगाबादमध्ये एका पतीने आपल्या पत्नीसोबत चक्क ‘मुळशी पॅटर्न’ स्टाईल तलवारीनं केक कापल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर याची दखल घेत पोलिसांनी पतीला ताब्यात घेतलं.

ही घटना औरंगाबाद शहरातील पुंडलीकनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या दांपत्यानं घरी केक मागवला होता. त्यानंतर पत्नीच्या हातात तलवार देऊन दोघांनी दिमाखात केक कापला. मात्र, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, आणि पोलिसांनाही मिळाला.

पोलिसांनी या व्यक्तीला शोधत त्याचं घर गाठलं. पोलिसांनी घराची झडती घेतल्यानंतर त्यांना पलंगाखाली तलवार लपून ठेवलेली आढळून आली होती. पोलिसांनी तलवार जप्त केली आणि हौशी पतीला अटक केली आहे.

दरम्यान, महत्वाचं म्हणजे हा व्यक्ती कुठलाही गुन्हेगार नाही. तर नोकरी करणारा एक युवक आहे. नांदेडहुन त्यानं तलवार आणून घरी ठेवली होती. पण तलवार बाळगणं हे तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

थोडक्यात बातम्या

निवडणुका संपल्या! आता मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

मुलांच्या खेळण्यावरुन दोन कुटुंबातील भांडणाने गाठलं टोक; घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

‘त्या पक्षाला उघडं करण्याचं काम भाजप करणार’, अदर पूनावाला प्रकरणात आशिष शेलार यांचा गौप्यस्फोट

रिक्षाचालकाची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या; धक्कादायक कारण आलं समोर

“भारतनाना माफ करा, पैसा आणि सैनिकांच्या पत्नीचा अपमान करणारी प्रवृत्ती जिंकली”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More