बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लग्नात नवरा पोहोचला दारुच्या नशेत, हार घालताना समोर पत्नी दिसलीच नाही अन्…

नवी दिल्ली | दारुच्या नशेत अनेक वेळा माणूस हद्द पार करतो. कोणी कोणाला मुदाम त्रास देतो तर कधी कोणी हास्यस्पद कृत्य करतं. अशातच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दुसरं कोणी नाही तर स्वतः नवरदेवच त्याच्या लग्नात दारु पिऊन आला आहे. मात्र यानंतर जे झालं ते पाहून तुम्हाला देखील हसू आवरणार नाही.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये संबंधित नवरदेव दारु पिऊन मंडपात पोहोचला. यानंतर हार घालण्याची वेळ आली. यावेळी दारुच्या नशेत असलेल्या नवरदेवाला समोर असलेली नवरी दिसलीच नाही. यामुळे नवरदेव नवरीला हार घालण्याऐवजी तिच्या शेजारी असलेल्या करवलीला हार घालण्यास गेला.

नवरीला हार घालण्याऐवजी करवलीला हार घालताना नवरदेवाच्या परिवाराने त्याला सावरलं. मात्र पुन्हा नवरीला हार घालताना नवरदेवाचा तोल गेला आणि तो खाली पडला. नवरदेवाची स्थिती पाहून कोणालाही हसू आवरणार नाही. विशेष म्हणजे हा संपुर्ण प्रकार नवरीने अगदी शांतपणे सहन केला आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ ट्विटरवरुन शेअर करण्यात आला आहे. मात्र या व्हिडीओने सध्या सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातला आहे. या व्हिडीओला प्रचंड प्रमाणात शेअर केलं जात असून मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

पाहा व्हिडीओ

थोडक्यात बातम्या- 

“आमचा ‘राजा’ तुमच्या राजासारखा खोटं बोलत नाही”; गडकरींचा जुना व्हिडीओ शेअर करत मनसेचं उत्तर

महाराष्ट्राच्या ‘या’ शहरातील पालिकेची 11 कोविड सेंटर होणार बंद; रुग्णसंख्या घटल्याने प्रशासनाचा निर्णय

… आणि त्या निर्णयामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; प्रवासी संख्या घटल्याने पुणे विभागातील ‘या’ रेल्वे गाड्या राहणार बंद

राज्यातील 12वी बोर्डाची परीक्षा रद्द होणार?; शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचं सुचक वक्तव्य

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More