मुंबई | जगातील तमाम महिलांची इच्छा असते की आपल्या नवऱ्यानं कोणत्याही इतर महिलेसोबत बोलू नये. जर असं करताना नवरा सापडला तर त्याची फार फजिती होते. पण हेच जर लग्नाच्या दिवशीच झालं तर काय होईल. असंच झालंय एका लग्नात आणि नवरा मैत्रिणीशी बोलतानाचा हा व्हिडीओ सध्या नेटकरी व्हायरल करत आहेत.
नवरा मुलगा त्याच्या मैत्रिणीशी बोलत बसलेला आहे. त्याची नवरी त्याला बोलावते पण तो तिला इशाऱ्यानं थोडावेळ थांबण्यास सांगतो. त्यानंतर काही वेळातच नवरी त्याच्या डोक्यावर हातानं मारते आणि जवळ बसायला सांगते. तेव्हा हे पाहून सर्वजण जोरात हसायला लागतात.
सध्या नवरा-नवरीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओला शेअर करत अनेकजण बायकोशी प्रामाणिक रहाण्याचा सल्ला देत आहेत. तर काहीजण लग्न झाल्यावर मैत्रिणीशी बोलण्यात काय चुकीचं आहे, असं शेअर करताना कॅप्शन देत आहेत.
दरम्यान, सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशात सध्या लग्नसराई चालू असल्यानं या व्हिडीओला अधिक प्रमाणात शेअर करण्यात येत आहे.
पाहा व्हिडीओ –
View this post on Instagram
थोडक्यात बातम्या –
गायिका आशा भोसलेंचा मुलगा दवाखान्यात दाखल; प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर
“…तर कारवाई केली जाईल”; रुपाली ठोंबरेंची थेट राज ठाकरेंवर टीका
…अन् भर पत्रकार परिषदेत शरद पवारांनी बाबासाहेब पुरंदरेंचा माफीनामा वाचून दाखवला
“…म्हणून भाजप ठाकरे सरकारवर दबाव आणतंय”, पवारांनी सांगितलं कारण
“मनसे आता उद्धव ठाकरेंचे वडीलही हायजॅक करणार का?”
Comments are closed.