बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शेजारील तरुणासोबत पत्नीचे प्रेमसंबंध असल्याचं समजल्यानंतर पतीने उचललं धक्कादायक पाऊल

मुंबई | लग्नानंतर काही काळ संसार चांगला चालू असतो. काही काळानंतर आपल्या जोडीदाराला वैतागून नवरा नाही तर बायको दुसऱ्याच्या प्रेमात पडल्याच्या अनेक घटना पाहायला मिळतात. यातून अनेक गुन्हे घडतात तर अनेकांचं दुसरं लग्न होतं. अशीच एक घटना मुंबईमध्ये घडली आहे.

संबंधित पतीचं नाव महेश सोनी असं आहे. तसेच महेश याच्या पत्नीचं नाव पुनम सोनी असं आहे. पुनम रोज रात्री घरी उशिरा येत होती. यावरुन तिच्या पतीला तिच्यावर संशय येऊ लागला. याबाबतची विचारणा केल्यावर पुनमने हा विषय टाळला. त्यानंतर  महेशने तपास चालू केला. यादरम्यान आपल्या पत्नीचे शेजारील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचं महेशला समजलं.

महेशने पुनमला अनेकवेळा समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र पुनम ऐकण्यास तयार नव्हती. यावरुन दोघांमध्ये भांडणं होऊ लागली. तरी देखील पुनमचे रात्री उशीरा घरी येणे सुरुच होते. घटनेच्या दिवशी पुनम रात्री उशीरा घरी आली. यावरुन त्यांच्यामध्ये पुन्हा वाद झाले. हे वाद एवढे टोकाला गेले की संतापलेल्या महेशने गावावरुन आणलेल्या  चाकूने पुनमवर सपासप वार केले. त्याने पुनमच्या गळ्यावर, छातीवर आणि पोटावर सपासप दहा वार केले.

दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या पुनमचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच कुरार पोलीस काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आरोपी महेश पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला अटक करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या- 

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी 27 वर्षांच्या संसारानंतर घेतला पत्नीशी घटस्फोट

खुशखबर! सर्वांची कोरोना संकटातून अखेर सुटका होणार; ‘या’ संशोधनाचा निष्कर्ष आला समोर

पंढरपूरमध्ये पुन्हा पोटनिवडणूक घ्या; राष्ट्रवादी काँग्रेसचं निवडणूक आयोगाला पत्र

“चांगली गोष्ट करण्यासाठी गैरमार्गाचा वापर झाला तर त्या मागचा हेतू कधीच शुद्ध राहत नाही”

दिलासादायक! मुंबईतील कोरोना रूग्णसंख्या झपाट्याने कमी व्हायला सुरूवात; बरे होणाऱ्यांचं प्रमाण अधिक

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More