बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुल होत नाही म्हणून पतीने उचललं अत्यंत धक्कादायक पाऊल!

हैद्राबाद | हैद्राबाद येथील एका गावात अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नाच्या अनेक वर्षांनंतर देखील अनेक जोडप्यांना मुल होत नाही. यातून मग संबंधित नवरा-बायको वेगवेगळे मार्ग आवलंबतात. मात्र केवळ लग्नाच्या एक वर्षातच मुल झालं नाही म्हणून संबंधित पतीने जे केलं ते अत्यंत धक्कादायक आहे.

संबंधित घटना ही हैद्राबाद मधील कुकटपल्ली येथील आहे. येथे रहिवासी असणाऱ्या तरुणाचं एक वर्षापुर्वीच लग्न झालं होत. त्यानंतर तो वसंतनगर येथील एका अपार्टमेंटमध्ये आपल्या पत्नीसोबत राहू लागला. यादरम्यान त्यांना मूल होत नसल्याने ते डाॅक्टरांकडे उपचार देखील घेत होते. संबंधित पतीचं नाव रोहन (काल्पनीक नाव) असं आहे. रोहनला अगोदरपासून मनोविकार देखील होता.

सोमवारी सकाळी रोहनच्या पत्नीने त्याला तिच्यासोबत दवाखान्यात चलण्यास सांगितलं. मात्र यावर रोहन तिच्यावर चिडला आणि घरातून निघून गेला. त्यानंतर त्याच्या पत्नीने खूप वेळ त्याची वाट पाहिली मात्र रोहन काही घरी परतला नाही. रात्रभर वाट पाहून देखील रोहन घरी परतला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहनच्या घरा शेजारील महिलेचा किंचळण्याचा आवाज आला. रोहनच्या पत्नीने देखील तिकडे धाव घेतली.

दरम्यान, रोहनची पत्नी घटनास्थळी पोहोचताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. रोहनने शेजारच्या घरातील स्वयंपाक खोलीत गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं होतं. रोहनने त्यांच्या शेजारच्या घरातील किचनमधल्या पंख्याला गळफास घेतला होता. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलीस आता याबाबतचा तपास करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

नांदेडमध्ये माणुसकी मेली, पैसे उकळण्यासाठी मृत कोरोना रुग्णावर तीन दिवस उपचार

’14 तास खवळलेल्या समुद्रात पोहत होतो’; वादळातून बचावलेल्या सुनिलकुमारांनी सांगितला चित्तथरारक अनुभव

ऐकावं ते नवलंच, महामारीला पळवायचंय म्हणून थेट कोरोना देवीची स्थापना!

राज्यात म्युकरमायकोसिसचा धोका वाढला, पुढचे 10 दिवस अत्यंत महत्त्वाचे- राजेश टोपे

लग्नानंतर कोरोनाची बाधा, नवरदेवाची आठवडाभर मृत्यूशी झुंज, नियतीने घात केलाच

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More