बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पत्नीवर संशय असलेला पती करायला गेला एक अन् झालं असं काही की…

मुंबई | लग्नाच्या काही दिवसांनंतर अनेक वेळा नवरा किंवा बायकोला आपल्या जोडीदारावर संशय येत असल्याच्या अनेक घटना आपण ऐकतो. मात्र, यातूनच नंतर गुन्हे देखील होत असल्याचं आपण पाहतो. अशाचप्रकारे एका पतीला आपल्या पत्नीवर संशय आला. मात्र त्याने जे केलं ते अत्यंत विचित्र होतं.

संबंधित आरोपीचं नाव तुषार शिलवंत असं आहे. आरोपीची पत्नी एक ब्युटीशिअन आहे. मात्र सध्या ते दोघे विभक्त राहतात. आरोपीची पत्नी ज्या ब्युटीपार्लरमध्ये काम करते. त्याठिकाणी एक व्यक्ती अधूनमधून मसाज करण्यासाठी जात होता. त्यामुळे त्याचे आणि आपल्या पत्नीचे प्रेमसंबंध असल्याचा संशय आरोपी शिलवंत याला आला.

7 एप्रिल रोजी संबंधित व्यक्तीला एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. त्यावेळी आरोपीने आपण वाशी येथील गुन्हे शाखेचा पोलीस अधिकारी बोलत असल्याचे सांगितले. ब्युटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या महिलेसोबत तुझे प्रेमसंबंध आहेत, त्यामुळे कारवाई टाळायची असेल तर दहा लाख रुपये दे, अशी धमकी आरोपीने दिली. संबंधित व्यक्तीने चार दिवसांत पाच लाख रुपये दिले. मात्र आरोपी याने 1 मे रोजी पुन्हा फोन करुन पाच लाख रुपयांची मागणी केली. त्यावेळी हे प्रकरण कायमचे मिटवायचे असेल तर आणखी पाच लाख रुपये दे, अशी धमकी दिली.

दरम्यान, घाबरलेल्या फिर्यादी यांनी कर्ज काढून पैसे देण्याची तयारी दाखवली. मात्र, आरोपीने त्यांना त्रास देणे सुरुच ठेवले. आरोपीच्या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. फिर्यादी यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सापळा रचून आरोपी शिलवंतला अटक केली.

थोडक्यात बातम्या-

‘या’ कंपनीकडून ग्राहकांना मिळणार फ्री रिचार्ज; कोरोनाकाळात ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न

आयकर अधिकाऱ्याचा महिला डॉक्टरवर बलात्कार; व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी

“अजित पवारांनी कोवॅक्सिन लस निर्मितीचा प्रकल्प राजकीय वजन वापरून पुण्याला पळवला”

कोविशिल्ड लस घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; आरोग्य मंत्रालयाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

कोरोनातून बरे झालेल्या लहान मुलांना ‘या’ नव्या आजाराचा धोका, नागपूरमध्ये रुग्ण वाढले

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More