बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आजचा ‘महाराष्ट्र बंद’ म्हणजे सरकारचा पुरस्कृत दहशतवाद”

मुंबई | लखीमपूर हिंसाचार घटनेचा निषेध म्हणून आज महाविकास आघाडी सरकारकडून महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यामुळे आता राज्यात बऱ्याच ठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याचं पहायला मिळालं. त्यावरून आता राज्यातील राजकारण तापत असल्याचं दिसत आहे. त्यावरून आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

आज आघाडी सरकारने पुकारलेल्या बंदमुळे आता सरकारचा ढोंगीपणा समोर आला आहे. महाविकास आघाडीचं सरकार हे पुर्णपणे ढोंगी सरकार आहे. लखीमपूरच्या निमित्ताने बंद पुकारला जातो. मात्र, महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जात नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारवर केली आहे.

राज्य सरकारमध्ये जरा तरी नैतिकता शिल्लक असेल तर, हा बंद संपेपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना मदत करावी, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे. लखीमपूरच्या घटनेवर सरकार आपली राजकीय पोळी भाजताना दिसतंय. त्यामुळे एकूणच सरकार स्पाॅन्सर दहशतवाद असल्याचं देखील देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे.

दरम्यान, सरकारने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केलेल्या 25 आणि 50 हजारांच्या घोषणा हवेतच विरल्या. त्यामुळे आजचा महाराष्ट्र हा सरकारचा ढोंगीपणा आहे.

थोडक्यात बातम्या-

रकुल प्रीत सिंह करतीये ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला डेट; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

भन्नाट ऑफर! लस घेतली तर मिळणार ‘या’ गोष्टी मोफत

अजब! ‘पैसे नव्हते तर कुलूप कशाला लावलं’, चोरीनंतर चोराने लिहीलेल्या चिठ्ठीचीच सर्वत्र चर्चा

‘ही’ सरकारी कंपनी वाटणार मोफत सिमकार्ड; वाचा सविस्तर

“हे तर मुलांचं राज्य आहे, मुलींचा सन्मान यांची संस्कृती नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More