बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन् माहीने पुन्हा एकदा जिंकलं मन; धोनीच्या ‘त्या’ निर्णयाचं सर्वत्र कौतूक

मुंबई | आयपीएल 2021 चा अंतिम सामना 15 ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यानंतर 17 ऑक्टोेबरपासून आंतरराष्ट्रीय टी-20 विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. भारतीय संघ पाकिस्तान संघाविरूद्ध विश्वचषक स्पर्धेला सुरूवात करणार आहे. या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला संघाचा मेेन्टाॅर करण्यात आला आहे. धोनीने भारतीय संघाचं कर्णधारपद सोडलं, तेव्हा चाहत्यांना जबरदस्त बसला होता. मात्र अलिकडेच घेतलेल्या निर्णयावरून धोनीचं सर्वत्र कौतूक केलं जात आहे.

भारताने धोनीच्या नेतृत्वाखाली 2007 साली टी-20 विश्वचषक जिंकला होता. त्याचबरोबर श्रीलंका संघाविरूद्ध अखेरच्या क्षणी षटकार ठोकून 2011 साली एकदिवसीय विश्वचषक सुद्धा धोनीने मिळवून दिला. 2013 सालची आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी असो की, आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज सोबत खेळताना आपल्या कामगिरीने धोनीने सगळ्यांना अचंबित केलं आहे. त्यामुळेच विश्वचषकासाठी संघातील मेंटारची जबाबदारी बीसीसीआयने धोनीकडे सोपवली. मात्र धोनी यावेळी कोणतंही मानधन किंवा पैसे घेणार नाही, असं बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सांगितलं आहे.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ विश्वचषकासाठी मैदानात उतरणार आहे. या स्पर्धेनंतर टी-20 संघाचं कर्णधारपद सोडणार असल्याचं विराट कोहलीने जाहीर केलं. त्यामुळे सलामीवीर फलंदाज रोहित शर्माकडे टी-20 संघाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची शक्यता वतर्वण्यात येत आहे.

दरम्यान, आयपीएल 2021 मध्ये खेळताना धोनीने आपल्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन पोहचलं आहे. बाद फेरीच्या सामन्यात खेळताना दिल्ली कॅपिटल्स संघाला धूळ चारत चेन्नईचा संघ दिमाखात अंतिम फेरीत दाखल झाला आहे. आयपीएलचा अंतिम सामना 15 ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यावेळी धोनी संघाला चौथ्यांदा आयपीएलचा किताब मिळवून देणार की नाही, ते आता पहावं लागणार आहे.

थोडक्यात बातम्या-

“भैय्या दवाखान्यात जाऊनसनी काय करू?, मेलो तरी चालेल पण मागं हटायचं नाय”

”जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ शब्द कोणी खेचू शकत नाही’; पंकजा मुंडेंचा फडणवीसांना टोला

“…तर मोठी किंमत मोजावी लागेल”; मेहबूबा मुफ्तींचा मोदींना थेट इशारा

रामदास कदमांना दसरा मेळाव्याचं निमंत्रण नाही?; अरविंद सावंतांचं मोठं वक्तव्य

मनसेचा नेता फडणवीसांच्या दारी?; सांगितलं… नेमकं काय घडलं भेटीत!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More