बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गृहमंत्र्यांच्या भ्रष्ट कारभाराबाबत पवारांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना कल्पना दिली होती- परमबीर सिंह

मुंबई | राज्याच्या गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना 100 कोटी महिन्याला वसुल करायला सांगितले असल्याचा धक्कादायक आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित केला आहे. सिंह यांच्या या आरोपाने राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. परमबीर सिंह यांनी जे पत्र लिहिलं होतं त्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांचंही नाव घेतलं आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्ट कारभाराबद्दल शरद पवार, मुख्यमंत्री  आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पूर्वीच कल्पना दिली होती, असा दावाही सिंह यांनी पत्रात केला आहे. यावर मुख्यमंत्री  आणि उपमुख्यमंत्री काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मार्चच्या मध्यावर वर्षा बंगल्यावर मी तुम्हाला भेटण्यासाठी आलो. तिथे अँटिलिया प्रकरणाची पूर्ण माहिती देत होतो. त्या वेळी मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्ट कामाबद्दलही तुमच्या कानावर घातले होतं. इतकंच नाहीतर उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार यांनाही देशमुखांच्या चुकीच्या कृतीची माहिती दिली. तिथे उपस्थित असलेल्या इतर मंत्र्यांना खरेतर ही माहिती आधीच होती असं माझ्या लक्षात आलं असल्याचं परमबीर सिंह यांनी म्हटलं आहे. एकीकडे माजी पोलीस आयुक्तांनी असे सनसनाटी आरोप केले आहेत तर दुसरीकडे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे असून स्वतःचा बचाव करण्यासाठी मला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी त्यांनी रचलेलं हे षडयंत्र आहे, असल्याचं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. अनिल देशमुखांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे या आरोपांवर आपलं स्पष्टीकरण दिलं आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

मुख्यमंत्र्यानी परमबीर सिंह यांच्या आरोपाची निष्पक्ष चौकशी करावी- अनिल देशमुख

“आता कळलं का?,वाझे नोटा मोजण्याची मशीन घेऊन का फिरत होता”

“आबा आज तुमची खूप आठवण येतेय, गृहमंत्री म्हणून राज्याला आपणच पाहिजे होता”

“100 कोटी खंडणी प्रकरणाशी मुख्यमंत्र्यांचा थेट संबंध, गृहमंत्र्यांसोबत त्यांनीही राजीनामा द्यावा”

महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी ही घटना आहे- राज ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More