बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात नव्याने निर्बंध लावण्याचा विचार- मुरलीधर मोहोळ

पुणे | पुण्यातील वाढती रुग्णसंख्या पाहता शहरात नव्याने काही निर्बंध घालण्याचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू आहेत. असं असलं तरी पुण्यात संपूर्ण लॉकडाऊनचा विचार नाही, पुण्यात पुन्हा कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असून मंगळवारी एकाच दिवशी 1086 नवीन रुग्ण आढळून आले. तर 7020 इतके सक्रिय रुग्ण सध्या शहरात असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हजाराच्या संख्येने दररोज नवीन रुग्णांची भर पडत आहे. सध्या पुण्यात रात्रीची संचारबंदी लागू आहे. तर शाळा आणि महाविद्यालय देखील बंद ठेवण्यात आली आहेत. असं असलं तरी रुग्णसंख्या वाढत असल्याने अधिकचे काही निर्बंध लावण्याचा विचार महापालिका पातळीवर सुरु आहे, असं सुचक वक्तव्य त्यांनी यावेळी केलं.

फेब्रुवारीमध्ये केवळ 133 सक्रिय रुग्ण होते तर ती संख्या आता 7 हजारांच्या पुढे गेली आहे. ही चिंता करण्याची गोष्य आहे. सध्या रुग्णांना जास्तीत जास्त बेड उपलब्ध करुन देण्यात येत आहेत, तर चाचण्या देखील वाढवण्यात आल्या आहेत. सध्या लाॅकडाऊनचा कुठलाही विचार नाही. मात्र, नव्याने काही निर्बंध घालण्याचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरु आहे. यावर राज्यसरकार, पोलीस आणि पालिका प्रशासन यांच्या एकत्रित बैठकीत निर्णय होईल, असं महापौर म्हणाले.

दरम्यान, उद्याने, स्विमिंग पूल, जिम, मल्टिप्लेक्स, लग्न समारंभ आणि जेथे गर्दी वाढत आहे. तेथे निर्बंध लावण्याचा विचार आहे. आम्ही नव्याने काही कोव्हिड केअर सेंटर सुरु करत आहोत, अशी माहिती देखील महापौरांनी पत्रकार परिषदेत दिली.

थोडक्यात बातम्या – 

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर हल्ला; पायाला झालीय गंभीर दुखापत

पुणेकरांनो काळजी घ्या!; कोरोना रुग्णवाढीची आजची आकडेवारी देखील अत्यंत धक्कादायक

‘सचिन वाझे जणू ओसामा बीन लादेन…’; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

जागतिक अंतिम कसोटी सामना ‘लाॅर्डस’ नव्हे तर ‘या’ ठिकाणी होणा

“जो पर्यंत मुख्यमंत्री गप्प तो पर्यंत विधानसभा ठप्प”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More