Ram Mandir | रामलल्लाची मूर्ती आली समोर; भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे फोटो

अयोध्या | अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिरात (Ram Mandir) होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा विधींना सुरुवात झाली आहे. संपूर्ण देशभरातील रामभक्त या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. देशभरात राममय भगवं वातावरण तयार झाल्याचं पाहायला मिळत आहे. काल म्हणजेच गुरुवारी राम मंदिराच्या गाभाऱ्यात मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. प्राण प्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी, रामलल्लाच्या पूर्ण मूर्तीचा पहिला फोटो समोर आला आहे. मुर्ती काळ्या पाषाणापासून बनलेली आहे.

रामलल्लाची मूर्ती आली समोर

सोशल मीडियावर प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा हा पहिला वहिला फोटो चांगलाच व्हायरल होत आहेत. या व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये प्रभू श्रीरामाची मूर्तीही बालरूपातील आहे. मुर्तीचे फोटो सोशल मीडिया व्हायरल होताना दिसत आहेत. तसेच भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे हे फोटो आहेत.

Ram Mandir | भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे फोटो

गर्भगृहात ठेवण्यात आलेली मूर्ती झाकून ठेवण्यात आली असून ती अभिषेकदिनी उघडण्यात येणार आहे. स्थापन करण्यात आलेल्या मूर्तीची उंची 51 इंच इतकी आहे.

कर्नाटकातील प्रसिद्ध मूर्तीकार अरूण योगीराज यांनी ही सुबक मू्ती साकारली आहे. कृष्णशिळेतून घडवलेली ही रामाची मूर्ती अरुण योगीराज यांनी तयार केली आहे.

कृष्णशिळेतून घडवलेली ही रामाची मूर्ती अरुण योगीराज यांनी तयार केली आहे. राम मंदिरासाठी एकाच वेळी तीन मूर्तीकार मूर्ती घडवण्याचे काम करत होते. त्यातील योगीराज यांची मूर्ती गर्भगृहात ठेवण्याचा निर्णय झाला.

दरम्यान, अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं येत्या 22 जानेवारीला लोकार्पण होत आहे. देशभरात आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. या कार्यक्रमाच्या निमित्ताने देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. केंद्र सरकारने अयोध्येतील राम मंदिर लोकार्पणाच्या दिवशी अर्ध्या दिवसाची सरकारी सुट्टी जाहीर केली आहे. त्यानंतर काही राज्यांमध्ये पूर्ण दिवसाची सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या- 

Ram Mandir | 22 तारखेला महाराष्ट्रात सुद्धा सुट्टी जाहीर, पाहा सरकारी आदेशात काय म्हटलंय

Pune News | अदानी कंपनीचं पुणेकरांना मोठं गिफ्ट!

PM Narendra Modi | सोलापूरकरांसमोर नरेंद्र मोदींना अश्रू अनावर, म्हणाले…

Taapsee Pannu | तापसी पन्नूचा सर्वांत मोठा खुलासा; म्हणाली, “10 वर्षांपासून एकाच..”

Rohit Pawar | सर्वात मोठी बातमी! रोहित पवारांना ईडीचा झटका