बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चक्क हवाई बेटांसारखी तीन दिवस रंगणार होती इगतपुरी रेव्ह पार्टी

नाशिक | इगतपुरी रेव्ह पार्टीमध्ये छापा टाकल्यानंतर दोन कोरिओग्राफर सोबत बिग बाॅस फेम हीना पांचाळला देखील अटक करण्यात आली आहे. अशातच आता या हायप्रोफाईल नशेबाजांच्या समूहाने ‘हवाईयन’ संकल्पनेवर अधारित तीन दिवसीय रेव्ह पार्टीचा बेत आखला होता, अशी धक्कादायक माहिती सोमवारी समोर आली आहे.

दोन खासगी बंगल्यात पियूष सेठियाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 22 जण एकत्र येऊन शुक्रवारपासून रेव्ह पार्टीत रंगले होते. सोमवारी 22 जणांना न्यायालयापुढे पोलिसांनी हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. आरोेपींची संख्या 31 वर पोहोचली आहे. आरोपींनी एका दिवसात महागड्या ब्रॅन्डची सुमारे सव्वा लाखाची दारू रिचविल्याचे बंगल्यांच्या परिसरात आढळून आलेल्या रिकाम्या बाटल्यांवरून पोलिसांनी निष्पन्न केले आहे.

‘हवाईयन’ अर्थात हवाई बेटांवरील संस्कृतीला साजेशा संकल्पनेवर आधारित ही पार्टी असते. यास ‘लुलु पार्टी’सुद्धा म्हटले जाते. रंगीबेरंगी फुलांची डिझाईन असलेले कमी-कमीत कपडे या पार्टीमध्ये घातले जातात. कारवाईवेळी हिना पांचाळ हिच्या सेलिब्रिटी ॲटिट्युडचा पोलिसांना सामना करावा लागत होता. महिला पोलीस अधिकाऱ्यांनी ‘खाकी’च्या शैलीत हिनाला दम भरल्यानंतर ती शांत झाली. त्यानंतर तिने तपासकार्यात सहकार्य केले.

दरम्यान, ड्रग्ज, कोकेन, चरस, गांजा यांसारखे अंमली पदार्थही पोलिसांच्या हाती लागल्याने बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. हवाई बेटांप्रमाणे ‘हवाईन थीम’च्या धर्तीवर रंगलेल्या या रेव्ह पार्टीचे मुख्य आकर्षण बॉलिवूडची अभिनेत्री हीना पांचाळ हिच होती.

थोडक्यात बातम्या-

एका महिन्यात 16 वेळा इंधन दरवाढ; इंधनदरवाढीने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

ओबीसी आरक्षणाबाबत देवेंद्र फडणवीस यांची ‘युज अँड थ्रो’ची भूमिका – एकनाथ खडसे

पोटनिवडणुकांबाबत ठाकरे सरकारचा निर्णय पक्का; थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

अखेर ट्विटरने हटवला भारताचा चुकीचा नकाशा; जम्मू काश्मीर आणि लडाख वेगळा देश दाखवल्याने पेटला वाद!

‘फडणवीस RSSच्या शिकवणीप्रमाणे आरक्षण संपवायला निघालेत’; काँग्रेसचा हल्लाबोल

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More