बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

त्याने भररस्त्यात तिच्यावर 25 वेळा चाकूनं केले वार; दिल्लीतील घटनेनं देश हादरला, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | देशात दिवसेंदिवस गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशात दिल्लीत घडलेल्या एका घटनेनं संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. दिल्लीत एका व्यक्तीने दिवसाढवळ्या भरबाजारात आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

रस्त्यात पत्नीला आडवून पतीने तिच्यावर सपासप वार केले आहेत. यावेळी रस्त्यावर अनेक लोक उभी होती. मात्र यापैकी कोणीही तिच्या मदतीला पुढे गेलं नाही. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात  व्हायरल होत आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. परिसरात भितीचं वातावरण आहे.

आरोपी पतिचं नाव हरिश मेहता असून मृत महिलेचं नाव नीलू आहे. 26 वर्षीय मृत नीलूचं आठ महिन्यापूर्वी आरोपी हरिशसोबत लग्न झालं होतं. आरोपी व्यक्ती हा मुळचा गुजरातमधील अलकापूरी येथील रहिवासी असून तो दिल्लीत एका मॅरेज ब्युरोमध्ये काम करतो. तर नीलू एका दिल्लीतील सफदरजंग येथील रुग्णालयात काम करत होती.

आपल्या पत्नीचे बाहेर कोणाशी तरी अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपीला पतीला आला. यावरून त्यांच्यात अनेकदा वादही झाल्याचं कळंतय. त्यामुळे मृत तरूणीने पतीला सोडून आपल्या आईवडिलांसोबत राहत होती. यामुळे पती हिरशने रागात येऊन पत्नीची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पाहा व्हिडीओ-

 

थोडक्यात बातम्या- 

खळबळजनक! पत्नीने तीन कोटींच्या विम्याच्या हव्यासापोटी पतीसोबत केलं धक्कादायक कृत्य

धक्कादायक! शिवसेनेच्या रणरागिणीचं कोरोनामुळे निधन

मोदींच्या कानात बोलणाऱ्या युवकानं ओवैसींना फटकारलं, “बाहेरील व्यक्तीला देशात कसं राहू देऊ?”

तुमचं घराचं स्वप्न पूर्ण होणार; गुढीपाडव्याला म्हाडाची मोठी सोडत

“शपथ घेतल्यापासून महाविकासआघाडी सरकार सापाला दूध पाजतंय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More