नांदेडमधील घटना गांभीर्याने घेतली, चौकशी करून कारवाई करणार- एकनाथ शिंदे

मुंबई | मराठवाड्यातील नांदेडच्या शासकीय रुग्णालयात घडलेल्या प्रकारावरुन एकच खळबळ उडाली आहे. शिवाय याला राजकारणात शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnvis) सरकार जाबाबदार असल्याची टीका सुद्धा करण्यात आली. वेिरोधी पक्ष नेत्यांनी तर मुख्यमंत्र्यांना तसेच आरोग्यमंत्र्यांना राजीनामा देण्याची मागणी देखील केली आहे. या सगळ्या प्रकारानंतर मुख्यमंत्र्यांनी याची गांमभीर्याने चौकशी केली.

24 तासात 24 रुग्णांच्या मृत्यू झाल्याने महाराष्ट्र हादरला. दरम्यान या घटनावर मंत्रिमंडळात चर्चा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसेच याची चौकशी सुरु असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

नांदेडमधील घटना (Nanded Civil Hospital) सरकारने गांभीर्याने घेतली असून त्या घटनेची चौकशी करण्यात येणार आहे. चौकशी झाल्यानंतर त्यावर योग्य ती कारवाई करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांनी सांगितलं.

दरम्यान, नांदेडमधील घटनेनंतर राज्याचे मंत्री गिरीश महाजन आणि हसन मुश्रीफ हे त्या ठिकाणी पोहोचले आहेत. त्या ठिकाणी मृत्यू कसे झालेत याची माहिती ते घेणार असून योग्य त्या सूचना करणार असल्याची माहिती आहे.

महत्त्वाच्या बातम्या-