बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सरकारने परमबीर सिंह यांच्या चौकशीचे आदेश दिलेल्या ‘त्या’ पोलीस महासंचालकाने दर्शवली असमर्थता

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची चौकशी करण्यासाठी पोलीस महासंचालक संजय पांडे यांना जबाबदारी दिली होती. मात्र, परमबीर सिंग यांची चौकशी करण्यास पांडेंनी असमर्थता दाखवली आहे. ठाकरे सरकारनं परमबीर यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पण, पांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. त्यामुळं सरकारला आता त्यांच्याऐवजी दुसरा अधिकारी नेमावा लागणार आहे.

संजय पांडे हे वरिष्ठ आयपीएस अधिकारी असून नुकत्यात झालेल्या बदलीमुळे ते राज्य सरकारवर नाराज होते. संजय पांडे हे 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन परमबीर सिंह यांची होमगार्डच्या प्रमुखपदी वर्णी लागल्यानं संजय पांडे यांना तुलनेनं कमी महत्त्वाच्या असणाऱ्या राज्य सुरक्षा महामंडळाच्या प्रमुखपदी नेमण्यात आलं, त्यामुळं त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

माझ्याहून 1-2 वर्ष ज्युनिअर असलेल्या अधिकाऱ्यांना मोठी पदं दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तुम्ही कार्यवाहक पोलीस महासंचालक बनवू शकत नाही. यूपीएससीला माझी फाईलच पाठवली नाही, हे सर्वच मी त्या पत्रात लिहिलं आहे. तसंच आता मी राज्य सरकारविरोधात न्यायालयात जाणार असल्याचंही ते म्हणाले होते.

दरम्यान, बदलीमुळे संजय पांडे प्रचंड नाराज आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या आधी एक पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. या पत्रात पांडे यांनी नेहमी आपल्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली होती. आपली क्षमता असूनही दरवेळी आपल्याला साईडलाईन करण्यात आले. कुवत असतानाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालकपद मिळाले नाही, असंही त्यांनी याआधी लिहिलेल्या पत्रात सांगितलं होतं

थोडक्यात बातम्या

अदर पुनावालांनी मागणी केली नसताना त्यांना सुरक्षा का पुरवली- नाना पटोले

जावई आणि सासू प्रेमसंबंधामुळे आले पळून, मात्र पुढे घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

“अदर पुनावालांना शिवसेनेच्या गुंडांनी लसीसाठी धमकी दिली”; वादग्रस्त वक्तव्यावरून शिवसेना आक्रमक

…अन् भर सामन्यात डेव्हिड वॅार्नर ढसाढसा रडला, फॅन्सही हळहळले!

धक्कादायक! पतीचा मृतदेह दिल्लीतील हाॅटेलमध्ये पडुन; पत्नी मात्र एकटीच परतली मायदेशी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More