बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

3 मिनीटांत 900 कर्मचाऱ्यांना काढून टाकणाऱ्या भारतीय CEOनं अखेर माफी मागितली, म्हणाले…

नवी दिल्ली | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बरेच दिवस लोकांना लाॅकडाऊनचा(Lockdown) सामना करावा लागला. या काळात सगळं काम घरुन आणि ऑनलाईन (Online) होत असलेलं पहायला मिळालं. अनेक मोठमोठ्या कंपन्यांचं कामही घरुन करण्यासाठी परवानगी दिली होती. त्यामुळे सगळंच ऑनलाईनमय झाल्याचं चित्र होतं. अशातच काही दिवसांपूर्वी एका कंपनीच्या सीईओनं झूम मिटींग बोलावून 3 मिनिटांत तब्बल 900 कर्माचाऱ्यांना निलंबित (900 Employed Suspended) केलं होतं.

न्यूयाॅर्कमधील Better.com कंपनी गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत आहे. याचं कारण असं की, या कंपनीचे सीईओ विशाल गर्ग (Vishal Gerg) यांनी तीन मिनिटांच्या झूम कॉलदरम्यान कंपनीतील 900 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं होतं. काढून टाकण्याचं  कारण न सांगताच त्यांनी घेतलेल्या या निर्णायामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला.  आता त्यांनी या कृतीबद्दल माफी मागितली आहे.

माझ्या लक्षात आलं आहे की, ज्या पद्धतीने मी संवाद साधला त्यामुळे ही वाईट परिस्थिती अजूनच बिघडली, असं विशाल गर्ग यांनी माफी मागितलेल्या पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, विशाल गर्ग यांनी 900 कर्मचाऱ्यांना निलंबित केलं होतं मात्र त्यांच्या कंपनीतील एकूण कर्मचाऱ्यांपैकी ही फक्त 9 टक्के संख्या होती. त्यामुळे त्यांच्या या बाॅसीवृत्तीवरुन त्यांना टींकाचा सामना करावा लागला.

 

थोडक्यात बातम्या –  

Omicronच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

‘…तर बिपीन रावत यांचा जीव वाचला असता’; त्या दिड मिनिटांनी घात केला

”जनरल बिपीन रावत यांची अपूर्व सेवा भारत कधीच विसरणार नाही”

सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर! पंतप्रधान नरेंद्र मोदीही वापरतात ‘हे’ हेलिकॅाप्टर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More