बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यातील ‘या’ भागात थंडीची लाट येणार, भारतीय हवामान विभागाचा अंदाज

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यवर परिणाम होतोय. त्यातच आता भारतीय हवामान विभागाकडून राज्यभरात थंडीच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील पाच दिवसामध्ये उत्तर पश्चिम आणि मध्य भारताच्या किमान तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

राज्यातील अनेक भागांमध्ये तापमानात मोठी घट पाहायला मिळत आहे. राज्यात मागील 24 तासांपासून पावसाचं वातावरण आहे. त्यामुळे वातावरणातील गारवा देखील वाढला आहे. मुंबई, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद सारख्या शहरांमध्ये 25 अंशाखाली कमाल तापमान नोंदवलं गेल आहे. तसेच मुंबईतील कमाल तापमानात देखील घट नोंदवली गेली आहे. रविवारी सांताक्रुझ वेधशाळेत कमाल तापमान 23.8 अंश सेल्सिअस इतक नोंदवलं गेलं.

पुढील 5 दिवसांत उत्तर-पश्चिम आणि मध्य भारताच्या बहुतांश भागांमध्ये किमान तापमानात 3-5 डिग्री सेल्सीयसने हळूहळू घट होण्याची शक्यता आहे. 25 आणि 26 जानेवारी रोजी उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी, थंडीची लाट येण्याची शक्यता आहे, असं आयएमडीने सांगितलं आहे.

दरम्यान, राज्यात आलेल्या वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. गहू, ज्वारी, मका या पिकांच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. हरभरा पिकाची जोमाने वाढ होऊनही वादळी वाऱ्याने पिकाचे आता नुकसान होत आहे. त्यातच मुंबईसह महाराष्ट्रातही कमालीची तापमान घट आहेत. त्यामुळे राज्यभरात थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे.

थोडक्यात बातम्या-

26 जानेवारीला पथसंचलनात दिसणार महाराष्ट्राचा अनोखा चित्ररथ! पाहा फोटो

“प्रशांत किशोर काॅंग्रेसमध्ये येणार होते पण…”, प्रियंका गांधींचा सर्वात मोठा खुलासा

लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर!

मोदींच्या मंत्र्याचा अजब कारभार! दार बंद करून केली अधिकाऱ्याला मारहाण

KL Rahul ठरला IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू; रक्कम ऐकून थक्क व्हाल!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More