बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारतीय हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा, चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातही…

नवी दिल्ली | एकीकडे थंडी सुरू असताना काही ठिकाणी मात्र जोरदार पावसाची शक्यता आहे.  थंडी सुरू असतानाच पावसाने पुनरागमन केल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. मात्र, ज्वारी पिकासाठी पावसाची आवश्यकता आहे. आता भारतीय हवामान विभागाकडून (IMD)  महाराष्ट्रासह (Maharashtra) आठ राज्यात जोरदार पावसाची (Heavy Rainfall) शक्यता वर्तवली आहे.

1 डिसेंबरपर्यत भारतातील आठ राज्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोमेरीन क्षेत्र आणि श्रीलंकेच्या  समुद्रकिनाऱ्याजवळ चक्रीवादळ निर्माण झालं आहे. तसेच उत्तर आणि पुर्वीय वारे आहेत. त्यामुळे काही राज्यामध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे मच्छिमारांनी मासे पकडण्यासाठी समुद्रात जाऊ नये, असं आवाहन हवामान विभागाने केलं आहे. अन्यथा जीव संकटात सापडू शकतो, असा इशारा देखील देण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शनिवारी तामिळनाडू राज्यात जोरदार पाऊस झाला आहे. पावसामुळे तामिळनाडू आणि केरळात पूरसदृश परिस्थिती आहे. तेथील लोकांनी  आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे. त्यातच पुन्हा एकदा तामिळनाडू,पुद्दुचेरी, केरळ, आंध्रप्रदेश आणि लक्ष्यद्वीप या राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

“उद्धव ठाकरे हे अपघाताने झालेले मुख्यमंत्री, केंद्राची कामंही त्यांनी आपल्या खात्यात मांडली”

संजय राऊत आणि सुप्रिया सुळेंचा भन्नाट डान्स व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

“पार्टी आणि पबमध्ये भाजप नेते नेमके कुठे असतात हे उद्यापासून काढायला लावू नका”

मी आताही सत्तेत नाही आणि भविष्यातही मला सत्ता नको- नरेंद्र मोदी

“हे महाविकास आघाडी नव्हे तर महाघोटाळा आघाडी सरकार आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More