बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आभाळाएवढी कामगिरी पण कर्णधाराचे पाय जमिनीवर; कांस्य पदक कोव्हिड योद्ध्यांना समर्पित

टोकियो | कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात भारताने जर्मनीला धूळ चारत भारतीय पुरूष हाॅकी संघानं दणदणीत विजय मिळवला आहे. भारत आणि जर्मनी यांच्यात झालेल्या रोमांचक सामन्यात भारताने 5-4 असा दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयाबरोबरच भारताने तब्बल 41 वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवलं आहे. त्यानंतर आता भारतीय संघानं सामन्याबरोबरच आता मन देखील जिंकलं आहे.

भारताने इतिहास रचल्यानंतर भारतीय पुरूष हाॅकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग याने आनंद व्यक्त केला आहे. त्याने संघातील खेळाडूंच्या कामगिरीचं कौतूक केलं. हे पदक आपल्या देशातील सर्व कोरोना योद्ध्यांना आणि पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांना समर्प्रित आहे, अशा भावना मनप्रीत सिंंग याने व्यक्त केल्या आहेत.

भारतीय हाॅकी संघातच सर्वात जास्त खेळाडू हे पंजाबचे आहेत. त्यामुळे पंजाब सरकारने संघातील हाॅकी खेळाडूंना 1 कोटीचं बक्षिस जाहीर केलं आहे. पंजाबचे क्रिडामंत्री राणा गुरमित सोडी यांनी याची माहिती दिली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील हाॅकी संघातील खेळाडूंचं कौतूक केलं आहे.

दरम्यान, पहिल्या सामन्यात 3-3 अशी बरोबरी असताना भारतीय खेळाडूंनी दमदार प्रदर्शन करत आघाडी घेतली. जर्मनीने एक गोल दागत सामन्यात चुरस निर्माण केली. अखेरच्या क्षणापर्यंत झालेल्या सामन्यात भारतीय डेफेन्डर्सने चांगला बचाव करत सामना फिरवला आणि अखेरच्या काही सेकंदात भारत जिंकला असं स्पष्ट झालं.

थोडक्यात बातम्या-

प्रशांत किशोर यांनी दिला मुख्य राजकीय सल्लागार पदाचा राजीनामा!

7 मुलांच्या 67 वर्षीय बापाने केला 19 वर्षीय तरुणीशी प्रेमविवाह, केली ‘ही’ मागणी

‘झिका व्हायरसमुळे घाबरून जाऊ नका’; आरोग्यमंत्री राजेश टोपेेंचं जनतेला आवाहन

“ज्यांनी स्वातंत्र्य आणि लोकशाहीवर हल्ले केले ते राजकारणातून संपले, हा या देशाचा इतिहास”“जिथे सत्ता नाही तिथे राज्यपालांच्या माध्यमातून भाजप सत्ता राबवतंय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More