बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारत पाकिस्तान सामन्यापुर्वी शाहिद आफ्रिदीच्या मनात चलबिचल, म्हणाला… 

नवी दिल्ली | भारत आणि पाकिस्तान सामन्यापुर्वी वातावरण चांगलंच तापलेलं आहे. अनेकांना या सामन्याची उत्सुकता आहे. रविवारी सायंकाळी 7:30 वाजता हा हायहोल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. आता भारत पाकिस्तान सामन्याअगोदर माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीने पाकिस्तान संघावर अविश्वास दाखवला आहे. टी-ट्वेन्टी विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ पाकिस्तान संघाला वरचढ ठरेल, असं शाहिद आफ्रिदीला वाटतंय.

पाकिस्तान मीडियाने शाहिद आफ्रिदीला कोणता संघ भारी पडेल, असा प्रश्न केला होता. विशेष बाब म्हणजे यावेळी आफ्रिदीने टीम इंडीयाचं नाव घेतलं आहे. दोन्ही संघ अनुभवी आहेत. 10-15 वर्षांपासून दोन्ही संघ उत्तम कामगिरी करत आहेत.  बीसीसीआयने भारतीय संघावर भरपुर पैसा खर्च केला. त्याचा त्यांना चांगला फायदा होतोय, असं म्हणत शाहिद आफ्रिदीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला जोरदार टोला लगावला आहे.

भारतीय संघाला पराभूत करण्याकरिता पाकिस्तान संघाला 100 टक्के क्षमतेने खेळावं लागेल, असं मत शाहिद आफ्रिदीनं व्यक्त केलं आहे. दबावात पाकिस्तान संघ मनापासून खेळला तर यशस्वी होऊ शकतो, असंही शाहिद आफ्रिदी म्हणाला आहे. हा खेळ मनापासुन आणि शांत डोक्याने खेेळणारा संघ यशस्वी होऊ शकतो. भारतीय संघ जिगरबाज आहे, असं शाहिद आफ्रिदीनं म्हटलं आहे.

दरम्यान, आतापर्यंत भारतीय संघाने पाकिस्तान संघाला एकदाही टी-ट्वेन्टी विश्वचषक स्पर्धेत विजयी होऊ दिले नाही. त्यामुळे भारतीय संघाला विजयाचा प्रबळ दावेदार मानलं जात आहे. टी-ट्वेन्टी विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान पाच वेळा आमनेसामने आले. पाचही वेळेस भारताने पाकिस्तानला धुळ चारली आहे. टी-ट्वेन्टी विश्वचषक स्पर्धेप्रमाणेच वन-डे विश्वचषक स्पर्धेतही भारतीय संघ कधीच पराभूत झालेला नाही.

थोडक्यात बातम्या- 

दुबईही झाली मालामाल! भारत-पाक सामन्यासाठी तब्बल ‘इतका’ तिकीट दर

शरद पवार महापालिका निवडणुकीच्या रिंगणात, दिवाळीनंतर राजकीय समीकरण बदलणार?

आर्यन खान प्रकरणाला नवं वळण, एनसीबी पंचानेच केले समीर वानखेडेंवर गंभीर आरोप

माही ‘हा’ सामना नको जिंकू म्हणणाऱ्या पाकिस्तानच्या तरूणीला धोनीचं भन्नाट उत्तर, पाहा व्हिडीओ

कांदा व्यापाऱ्यांकडे सापडलं 100 कोटींचं घबाड; नोटा मोजायला लागला ‘इतका’ वेळ

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More