बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘गाबा’चा घमंड उतरवलाच! भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत जिंकली मालिका

मुंबई | भारत आणि आस्ट्रेलियामधील चौथ्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला तीन गड्यांनी पराभूत करत बॉर्डर गावसकर कसोटी मालिका 2-1 जिंकली. त्यासोबतच गाबाच्या मैदानावर सलग 28 कसोटी कसोटी सामने जिंकणाऱ्या ऑस्ट्रलियाच्या विजयी रथाला भारताने रोखलं आहे.

ऑस्ट्रेलियालाने  भारताला अखेरच्या दिवशी 328 धावांचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर फंलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरूवात निराशजनक झाली. सलामीवीर रोहित शर्मा लवकर बाद झाला होता. मात्र त्यानंतर पुजाराने केलेल्या चिवट फलंदाजीच्या जोरावर एक महत्वाची भागिदारी शुभमन गिल यांच्यात झाली.

एकीकडून पुजाराने एक बाजू लावून धरत आस्ट्रेलियामधील गोलंदाजांचा घाम काढला होता. पुजारा बाद झाल्यावर ऋषभ पंतने संयमी आणि आक्रमक खेळी करत भारताला विजय मिळावून दिला.

दरम्यान, या मालिकेत 36 वर पुर्ण बाद झालेला संघ मालिका जिंकेल असा विचार कोणीही केला नव्हता. भारतीय युवा गोलंदाजांनी केलेली गोलंदाजी आणि फलंदाजांनी केलेल्या धाडसी खेळामुळे भारताचा विजय निश्चित झाला. या विजयामुळे भारतीय संघाचं सर्व स्तरातून कौतूक होत आहे.

 

थोडक्यात बातम्या-

‘घ्या निवडणुका, महाविकास आघाडीला बहुमत मिळालं तर…’; भाजपचं शिवसेनेला ओपन चॅलेंज

पाकिस्तानला हवी भारतीय लस; पुण्यातील सीरमच्या लसीसाठी प्रयत्न सुरु!

उपलब्ध बाजारपेठेनुसार पिके घेऊन शेतीला चांगला दर्जा मिळवून देऊया- शरद पवार

धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर 38 जणांचा लैंगिक अत्याचार

परळीतील विजयानंतर धनंजय मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More