मुंबई | नवीन वर्ष सर्वांना आरोग्यदायी आणि कोरोनामुक्त जावो अशा शुभेच्छा आरोग्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. तसेच नविन वर्षात नागरिकांसह आरोग्य यंत्रणा कोरोनाशी यशस्वी लढा देत आहे. कोरोना नियंत्रणात असला तरी त्यासाठीचे नियम पाळणं आवश्यक असल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
सूचना-
1. सार्वजनिक आरोग्य विभागातील पदभरतीसाठीची प्रक्रिया जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करावी.
2. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असून सार्वजनिक आरोग्य यंत्रणेने नॉन कोविड रुग्णांच्या सेवेकडे लक्ष द्यावे.
3. सेवेचा दर्जा उंचावतानाच सौजन्यपूर्ण वागणूक सामान्यांना द्यावी.
4. आरोग्य विभागाच्या महत्त्वाच्या योजनांच्या माहितीचा फलक प्रत्येक ग्रामपंचायतीवर लावावा.
5. दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करावी.
विभागातील पदभरतीला गती मिळावी यासाठी आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील विभागीय आयुक्त, मागासवर्ग कक्षाचे अधिकारी, आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.
थोडक्यात बातम्या-
“आमच्या फायद्यासाठी कायदे आणलेत म्हणता, मग ते मागे घेतल्याने कुणाचं नुकसान होणार आहे?”
कोरोनापासून स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर …- उद्धव ठाकरे
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना ‘या’ तारखेपासून 17 नंबरचा अर्ज भरता येणार!
औषध आणि काळजी हाच नववर्षाचा मंत्र- नरेंद्र मोदी
‘बिगर मुस्लीमांच्या नावाने रस्त्यांचं नामकरण व्हायला हवं’; भाजप खासदाराची मागणी