बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पावसाचा जोर पुन्हा वाढणार, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | राज्यात जून महिन्यात दडी मारून बसलेला पाऊस (Rain) जुलै महिन्यात मात्र चांगलाच बॅटिंग करत आहे. गुजरात, आसाम, उत्तराखंडमध्येही पावसाने चांगलाच जोर धरला आहे. राज्यांत काही दिवसांपूर्वी उसंत घेतलेल्या या पावसाने थोडासा दिलासा दिला होता. आता मात्र पुन्हा हवामान खात्याकडून मुसळधार पावसाची (Heavy Rainfall) शक्यता वर्तवण्यात येत आहे. अनेक धरण 100 टक्के प्रवाहाने भरून वाहत आहेत.

महाराष्ट्रासह इतर सहा राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. रविवारी विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसानंतर विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान खात्याकडून यलो अर्लट (Yellow Alert) जाहीर करण्यात आला आहे. विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली येथे प्रचंड पाऊस झाला आहे. उत्तर कोकणातील पालघर, नाशिक जिल्ह्यामधील घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे.

रविवारी पूर्व विदर्भातील आणि मराठवाड्यातील अकोला,नागपूर, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पर्जन्यवृष्टी झाली आहे. आज उत्तर कोकणासह मराठवाडा, विदर्भातील घाट संकुलातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. पालघर, नाशिक, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गुजरात राज्यांत मुसळधार पावसामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सूरत, नवसारी, वलसाड आणि डांग, तापी येथे पावसाची संततधार चालुच आहे. उत्तर प्रदेश, बिहारमध्येही पावसाचा जोर वाढला आहे. नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला असून आपतकालीन यंत्रणाही सज्ज झाल्या आहेत.

थोडक्यात बातम्या

मंकीपाॅक्सच्या ‘या’ गंभीर लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, वाचा सविस्तर

‘यापूर्वी आला नव्हतात पण आता याच’, बंडखोर आमदाराचं आदित्य ठाकरेंना आव्हान

‘राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जंजीरमध्ये अडकलेल्यांनी खंजीरची भाषा करु नये’, मुख्यमंत्र्यांचा घणाघात

सकाळी उठल्यानंतर तुम्हालाही ‘या’ गोष्टींची सवय असेल तर सावधान! आरोग्यावर होतील विपरित परिणाम

‘घर नसल्यामुळे पार्कमध्ये झोपायचे’, उर्फीने सांगितली तिच्या संघर्ष

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More