चोरट्या चीनचा रडीचा डाव; कोरोना लस बनवणाऱ्या भारतीय कंपन्या चीनच्या निशाण्यावर
नवी दिल्ली | मागील वर्षी 12 ऑक्टोबरला मुंबईत बत्तीगुल झाली होती. त्यानंतर अमेरिकेतील वृत्तसंस्था न्युयाॅर्क टाईम्सने याबाबत धक्कादायक खुलासा होता आणि त्यानंतर मंत्र्यांसकट अधिकाऱ्यांच्या झोपा उडाल्या होत्या. रेकाॅर्डेड फ्युचर या सायबर सेक्युरीटी कंपनीने याबाबत ब्लाॅगमध्ये या घटनेचा खुलासा केला होता. त्यानंतर आणखी एक मोठा सायबर हल्ला भारतीय कंपन्यावर करण्याचा प्रयत्न चीनकडून केला गेला आहे.
संबंधीत रेकाॅर्डेड फ्युचरच्या ब्लाॅगमध्ये यंत्रणेवर हल्ला करणाऱ्या मालवेअरचा शोध लागला असल्याचा दावा केला गेला होता. त्यानंतर आणखी एक मोठा सायबर हल्ला करण्याचा प्रयत्न चीनने केला असल्याची बातमी नुकतीच राॅयटर्सने दिली आहे. ही माहिती सायबर इंटेलिजन्स फर्म सायफर्मच्या हवाल्याने दिली आहे. यामध्ये भारतातील लस कंपन्यांना निशाण्यावर घेऊन सायबर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे.
भारत बायोटेक आणि सिरम इन्स्टिट्यूटचा या भारतातील कोरोना लस उत्पादन करणाऱ्या मुख्य दोन कंपन्या आहेत. या कंपनीच्या कोव्हीशिल्ड आणि कोव्हाॅक्सीन या लसी भारतात वितरीत केल्या जात आहेत. या दोन कंपनीच्या सिस्टीमवर चीनकडून हल्ला केल्याचा प्रयत्न करण्यात आला. सायफर्मच्या माहितीनुसार चीनचे हे हाकर्स APT10 या नावाने ओळखले जातात.
हल्ल्याबाबत चीनकडून कोणतीही अधिकृत माहिती दिली गेली नाही. तर दुसरीकडे भारत बायोटेक आणि सिरम इन्स्टिट्यूट यांनीही याबाबत कोणतंही स्पष्टीकरण दिलं नाही.
थोडक्यात बातम्या-
मी कोरोनाला कधीच घाबरलो नाही, कारण…- भगतसिंह कोश्यारी
पुण्यातील त्या पीएचडीच्या विद्यार्थ्याच्या हत्येमागचं गूढ उकललं; पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर
काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाणांवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी!
आयआयटी प्रोफेसर असल्याची बतावणी करून व्यापाऱ्यांना घातला ‘इतक्या’ लाखांना गंडा
“मोदींना आणि योगींना मुलं नाहीत ते काय कुणाला देऊन जातील”
Comments are closed.