बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

इस्ज्ञायल दूतावासाने मराठीतून ट्वीट करत ‘या’साठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं केलं अभिनंदन

मुंबई | मुंबई महानगरपालिका व आय.डी.ई वॉटर टेक्नॉलॉजीस लिमिटेड यांच्याद्वारे मालाड, मनोरी येथील तब्बल 200 दशलक्ष लिटर समुद्रातील खाऱ्या पाण्याचं रूपांतर गोड पाण्यात करण्याच्या प्रकल्प राबवला जाणार आहे. समुद्रातील पाण्याला गोड करण्याचा हा प्रकल्प इस्रायली तंत्रज्ञानाद्वारे केला जाणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महत्वाकांक्षी असलेल्या प्रकल्पाचं इस्त्रायली सरकारच्या वतीने कौतुक करण्यात आलं आहे. इस्त्रायल दूतावासाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. विशेषबाब म्हणजे त्यांनी मराठीतून ट्विट करत उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाण्याचे, पर्यावरणाचे आणि वेळेचे महत्त्व ओळखून मुंबईला नि:क्षारीकरणाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकल्याबद्दल आपले अभिनंदन. जल तंत्रज्ञानात आघाडीवर असलेला इस्रायल या वाटचालीत महाराष्ट्राच्या सोबत आहे, असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, मुंबई महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या लोकांना पाण्याचा पुरवठा सातत्यानं होत राहावा, यासाठी गेले काही वर्ष नवीन स्त्रोत बदलण्याचा विचार केला जात होता. काही वर्षांपूर्वी समुद्राचे पाणी गोड करण्याचा प्रस्ताव महापालिकेपुढे आला होता. परंतु, तत्कालीन आयुक्त यांनी हा प्रकल्प फीजीबल नाही, असे सांगून तू विचार मागे टाकला होता. मात्र, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर या प्रकल्पाला हिरवा सिग्नल दिला आहे. तसेच समुद्रातील पाण्याला गोड करण्याचा हा प्रकल्प असून हे एक क्रांतिकारी पाऊल असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

आनंदाची बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यातील 3 चिमुकल्यांनी केली डेल्टा प्लस विषाणूवर मात

जॅकी श्राॅफच्या मुलीचा लुक पाहून सर्वच झालेत हैराण, चाहते देखील म्हणाले… पाहा फोटो

“विधानसभेच्या अध्यपदासाठी आमचा काँग्रेसला पाठिंबा”

मोठी बातमी! 24 तासात जम्मू-काश्मिरात आढळून आले 2 संशयास्पद ड्रोन

अन् त्या महिलेवर कॅमेरा फोकस होताच प्रेक्षकांनी सुरू केला टाळ्यांचा कडकडाट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More