बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा न्यायालयाच्या कक्षेत

मुंबई | गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या बारा आमदारांच्या नियुक्त्या राज्यपालांकडून प्रलंबित असल्याचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. बाल विकास आघाडी सरकारकडून महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी त्यांच्याकडून राजकीय आकसापोटी 12 आमदाराच्या नियुक्त्या प्रलंबित असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

विधान परिषदेच्या आमदारांच्या नियुक्त्या प्रलंबित ठेवल्यामुळे आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये नाशिकचे रहिवासी रतन सोली यांनी याचिका दाखल केली आहे. राज्यपाल भगतसिंह होशियारी हे न्यायालयाच्या कक्षेत जरी येत नसतील तरी त्यांनी घेतलेले निर्णय हे कायद्याच्या कक्षेत असणं गरजेचं आहे, असं मत या याचिकेमध्ये मांडण्यात आलं आहे.

दरम्यान, भारतीय संविधान नियमांप्रमाणे राज्यपालांना कोणत्याही कायद्याच्या कक्षेत आणता येत नाही, पण राज्यपालांना 12 आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात प्रश्न विचारण्याचा आमचा अधिकार आहे. त्यांनी त्यांचा निर्णय जो काही असेल तो जाहीर करावा एवढीच मागणी आम्ही या याचिकेतून करत आहोत त्यानंतर राज्य सरकार पुढील पावले उचलेल, असं याचिकाकर्त्याने आपल्या याचिकेत नमूद केलं आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारने आठ महिन्यांपूर्वी 12 विधानपरिषद आमदारांची यादी राज्यपालांना पाठवली आहे परंतु आठ महिने उलटून गेले तरीही अद्याप राज्यपालांनी त्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही त्यामुळे राज्य सरकारमधील अनेक नेत्यांनी राज्यपालांवर टीका केली होती. न्यायालयात बारा आमदार यांच्या नावाला विरोध करणारी याचिका प्रलंबित असतानाच आता नवीन याचिका दाखल झाल्याने न्यायालय नेमकी काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

 

थोडक्यात बातम्या –

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More