बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“देवेंद्र फडणवीस सरकारने काढलेला ‘तो’ अध्यादेश लागू करावा”

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून सततच्या आणि मुसळधार पावसामुळे मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी तातडीने मदतीची घोषणा करावी, अशी मागणी केली जातीये. त्यातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारकडे मोठी मागणी केली आहे.

जिथं आठ-आठ दिवस गावंच्या गावं पाण्याखाली असताना पंचनामे कोणत्या गोष्टीचे करणार? 2019 मध्ये जेव्हा महापूराचं संकट आलं होतं. तेव्हा तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतेही पंचनामे न करता गरजूंपर्यंत मदत पोहचवली होती. आता मराठवाड्यात देखील तीच परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे आता सरकारने 2019च्या अध्यादेशाप्रमाणेच शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहचवली पाहिजे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

अतिवृष्टीमुळे शेतीचं अतोनात शेतीचं मोठं नुकसान झालं असलं तरी पावसाच्या निमित्ताने जलयुक्त शिवार अंतर्गत करण्यात आलेली कामे आणि त्याची उपयुक्तता सिद्ध झाली आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. जलयुक्त शिवार योजनेबाबत राज्यातील जनता समाधानी आहे. त्यामुळे यायोजनेमुळे पूर आला हे म्हणंच हास्यास्पद असल्याचं देखील चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.

दरम्यान,पंढरपूर पोटनिवडणुकीप्रमाणेच देगलूर-बिलोली पोटनिवडणूक देखील 100% आम्हीच जिंकणार आहोत, असा विश्वास देखील चंद्रकांत पाटलांनी यावेळी व्यक्त केला आहे.

थोडक्यात बातम्या-

पंजाब किंग्जला मोठा धक्का! ‘युनिव्हर्सल बाॅस’ आयपीएलमधून बाहेर

दिवाळीनंतरच सुरू होणार महाविद्यालये, मात्र… – उदय सामंत

मोठी बातमी! राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना सीबीआयकडून समन्स

“डोकंच नसेल तर शरीराचा काय फायदा? सेनापतीच नाही तर लढायचं कसं?”

रेल्वे स्टेशनवर सापडला होता नारायण, MPSCतून बनला अधिकारी; बच्चू कडूंचंही योगदान!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More