बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन् ‘या’ पत्रकाराने शेतकरी आंदोलनातच 12 लाखाच्या नोकरीचा दिला राजीनामा!

नवी दिल्ली | गेल्या पाच सहा वर्षांपासून लोकांच्या मनात मुख्य प्रवाहातील माध्यांमांविषयी नाराजी आहे. आजची माध्यमे विकली गेल्याचा आरोप सामान्य नागरिक करत आहे. माध्यामांवरील चर्चांना प्रोपोगंडाचं स्वरूप आलं आहे. यात काही मोजकेच पत्रकार प्राईम टाईमला मुळ मुद्यांवर आवाज उठवताना दिसतात. अशाच एका पत्रकारानं चक्क शेतकरी महामंचावर सर्वांसमोर राजीनामा दिला आहे.

दिल्लीमधील एका प्रमुख हिंदी वृत्तवाहिनीच्या रक्षित सिंग नावाच्या पत्रकाराने दिल्ली सीमेवर चालू असलेल्या शेतकरी आंदोलनात राजीनामा दिला. रक्षित काम करत असलेली वृत्तवाहिनी त्याला सत्य दाखवू देत नव्हती असा आरोप रक्षितने केला आहे. रक्षितला 12 लाखाचा पगार चालू होता. मागील 15 वर्ष रक्षित पत्रकार म्हणून काम करत होता.

मी पत्रकारिता केली ती फक्त सत्य दाखवण्यासाठी. हा फक्त एका वृत्तवाहिनीचा विषय राहिला नसून संपूर्ण माध्यम समुहाची तीच अवस्था झाली आहे. डोळ्यासमोर घडलेली घटना जर सांगता येत नसेेल तर काय उपयोग?, अशा नोकरीला लाथ मारतो म्हणत रक्षितने राजीनामा दिला.

माझ्या आई-वडिलांनी मला खुप कष्ट करून शिकवलं आहे. मी स्वतःच्या निर्णयाने पत्रकारीतेत उतरलो. मी मागील 15 वर्ष माझ्या कामाने खुश होतो. परंतू आता माझं मन अशा गोष्टीसाठी तयार होणार नाही म्हणून हा निर्णय मी घेतला आहे. असं रक्षित ट्विटरच्या माध्यमातून म्हणाला.

पाहा ट्विट- 

 

 

थोडक्यात बातम्या-

‘बिग बी’ यांच्या प्रकृतीत बिघाड स्वत: पोस्ट करत दिली माहिती

सावधान! पुणे जिल्ह्यात कोरोना पुन्हा पसरतोय हातपाय; पाहा सविस्तर आकडेवारी

बॉसशी बोलला खोटं, प्रकरण झालं मोठं; सुट्टीसाठी कर्मचाऱ्यानं दिलं ‘हेे’ धक्कादायक कारण!

सलमानच्या ‘त्या’ एक्सगर्लफ्रेंडवर झाला होता बलात्कार, अभिनेत्रीने केला मोठा खुलासा

एका मंत्र्याच्या राजीनाम्याची एक निर्णयाची पायरी ओलांडली आता…- पंकजा मुंडे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More