औरंगाबाद महाराष्ट्र

1 मे 2021 पर्यंत नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गावरील प्रवास सुरु होणार- उद्धव ठाकरे

औरंगाबाद | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अमरावती आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अमरावती येथील समृद्धी महामार्गाची पाहणी केली. यावेळी त्यांनी या महामार्गाचं काम उत्तम पद्धतीने सुरु असल्याचं म्हणत समाधान व्यक्त केलंय.

मुख्यमंत्र्यांनी अमरावती येथील समृद्धी महामार्गाची पाहणी केली. यावेळी त्यांनी या महामार्गाचं काम उत्तम पद्धतीने सुरु अस्लयाचं समाधान व्यक्त केलं.

येत्या 1 मे 2021 पर्यंत नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गावरील प्रवास सुरु होणार असल्याचीही माहिती दिली. यानंतर आता मुख्यमंत्री औरंगाबादेतील समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी करतील.

आज पहिल्यांदाच मी या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकर समृद्धी महामार्गाची पाहाणी करण्यासाठी आलो आणि इथे अप्रतिम काम सुरु आहे. याच्याबाबत महाराष्ट्रात उत्सुकता आहे. जेव्हा हा पूर्ण होईल मला खात्री आहे की देशातील सर्वौत्तम महामार्ग ज्याचा महाराष्ट्राला अभिमान वाटेल, असं काम आपण केलेलं असेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

‘हे हिंदू गद्दार आहे…’; युवराज सिंगच्या वडिलांचं वादग्रस्त वक्तव्य

‘मन में है विश्वास’नंतर ‘कर हर मैदान फतेह’; आयपीएस विश्वास नांगरे पाटील नव्यानं भेटणार!

वाह अजित दादा वाह, लाज नावाची गोष्ट शिल्लक राहिलीये का पाहा- निलेश राणे

शीतल आमटेंच्या आत्महत्याप्रकरणी अत्यंत धक्कादायक माहिती समोर!

शरद पवार यांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या