देश

कोरोनाच्या भीतीने खांदा द्यायला देखील कुणी आलं नाही; पोरांनी बापाचा मृतदेह सायकलवरुन स्मशानात नेला

बेळगाव | कोरोनाच्या भीतीने मृतदेह स्मशानात नेण्यासाठी कुणीही न आल्याने मुलांनी वडिलांचा मृतदेह सायकलवरुन स्मशानात नेला. बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील हुबळी गावात ही घटना घडली आहे

हुबळी गावात एका 70 वर्षाच्या वृद्ध व्यक्तीची तब्येत बिघडली. पण वृद्धाला दवाखान्यात उपचारासाठी घेऊन जाण्यास एकही रुग्णवाहिका मिळाली नाही. त्यामुळे वृद्धावर उपचार होऊ शकले नाहीत आणि घरातच त्याचा रात्री मृत्यू झाला.

सकाळी वृद्ध व्यक्तीचा मृतदेह स्मशानात नेण्यासाठी रुग्णवाहिका मिळाली नाही. तसेच कोरोनाच्या भीतीने गावकऱ्यांनीही वाहन देण्यास नकार दिल्याने मुलांनी वडिलांचा मृतदेह सायकलवरुन स्मशानात नेला.

दरम्यान, मृतदेह अशा पद्धतीने स्मशानभूमीत नेताना संपूर्ण गाव पाहत होतं पण कोणीही मुलांच्या मदतीसाठी पुढे आलं नाहीत.

महत्वाच्या बातम्या-

मठात 15 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; बीड जिल्ह्यातील धक्कादायक घटन

उत्तर प्रदेशात मुलीवर बलात्कार करून निर्घृण हत्या; शेतात सापडला मृतदे

पुढील तीन दिवस ‘या’ भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा

शाळा कधी सुरु होणार?; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली मोठी माहिती

राज्यातील मंदिरे, धार्मिकस्थळे लोकांसाठी सुरु करा, कारण…- रोहित पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या