बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जगप्रसिद्ध ‘लॅन्सेट’चा कोरोनाबद्दल धक्कादायक दावा, मोदी सरकारवर जोरदार टीका

नवी दिल्ली | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठा देशाला मोठा फटका बसला आहे. या लाटेत अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहे. अशातच ब्रिटनमधील जगप्रसिद्ध नियतकालिक ‘लॅन्सेट’ने कोरोनाबाबत धक्कादायक दावा केला आहे. त्यासोबतच मोदी सरकारवरही जोरदार टीका केली आहे.

भारतात 1 ऑगस्टपर्यंत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या एक लाखापर्यंत पोहोचू शकते,  असा दावा ‘लॅन्सेट’ने केला आहे. 10 लाख किंवा त्याहून अधिक माणसांचा मृत्यू होण्याची शक्यता असल्याचं इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्यूएशनया संस्थेने म्हटलं आहे. तर जर अशी स्थिती ओढवली, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचं ते सर्वांत मोठं अपयश असेल, असंही या नियतकालिकाने आपल्या संपादकीय लेखात म्हटलं आहे.

ट्वीटरवर टीका करणाऱ्यांना रोखण्यापेक्षा कोव्हिडला रोखण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भर द्यायला हवा होता, असं म्हणत लॅन्सेटमध्ये नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. केंद्रीय पातळीवर लसीकरण अभियान अपयशी ठरलं आहे. लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यासंदर्भात तसंच अठरा वर्षांवरील वयाच्या लोकांना लस देण्याबाबत केंद्राने राज्य सरकारांशी चर्चा केली नाही. अचानक धोरणात बदल केला आणि त्यामुळे लसीचा पुरवठा कमी पडू लागला आणि त्यामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं असल्याचं लॅन्सेटमध्ये सांगितलं आहे.

दरम्यान, धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनाने कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो असे वारंवार इशारे देण्यात येऊनही मोदी सरकारने त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे असे कार्यक्रम, जाहीर सभांमध्ये लाखो लोक उपस्थित राहिले. त्यामुळे कोरोना संसर्ग प्रचंड वाढला असल्याचं लॅन्सेटमध्ये म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत फॅमिली डॉक्टर्सवर ही मोठी जबाबदारी, सरकारचा मोठा निर्णय

चिंताजनक! शनिवारी देशात सर्वाधिक कोरोनाबाधितांच्या मृत्युची नोंद; रूग्णसंख्याही वाढली

‘या’ राज्यात कोरोना रूग्णसंख्या वाढत असल्याने सरकारने लॉकडाऊनही वाढवला

“राज्याला पुरेशी लस कशी मिळेल यासाठी केंद्राला पत्र जरूर लिहावं”

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी उद्यापासून 3 दिवसांची सुट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More