बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोदी सरकारनं दिली आत्तापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर; खरेदी करणार ‘इतके’ कोटी डोस

नवी दिल्ली | कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेविषयी सतर्कता बाळगली जात आहे. तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. लसींचा तुटवडा भासू नये म्हणून मोदी सरकारने आणखी लसींच्या डोसची आॅर्डर दिली आहे. ही आॅर्डर आत्तापर्यंतची सर्वात मोठी आॅर्डर ठरणार आहे.

केंद्र सरकार लसीकरणासाठी कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसींचे तब्बल 14 हजार 505 कोटी रुपयांचे जवळपास 66 कोटी डोस खरेदी करणार आहे. यामुळे निश्चित देशातील कोरोना लसीकरणाचा वेग वाढेल.

केंद्राने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालानुसार, ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीमध्ये देशात 135 कोटी डोस उपलब्ध करुन देण्याचे केंद्राचे लक्ष्य आहे. ते समोर ठेवूनच ही आॅर्डर देण्यात आली आहे. या 66 कोटी डोस व्यतिरिक्त सरकारनं कोर्बेवॅक्‍स या लसीचे 30 कोटी डोस जास्त रक्कम देऊन राखीव ठेवल्याची माहिती आहे.

दरम्यान, डोसमुळे वर्षाअखेरीपर्यंत देशातील 18 वर्षांहून अधिक वय असलेल्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण होण्यास मदत होणार आहे. ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीतील कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन यांचे एकूण उत्पादन 88 कोटी एवढे ठरवण्यात आले आहे.

थोडक्यात बातम्या – 

टी-सिरीजचे मॅनेजिंग डायरेक्टर भूषण कुमारवर बलात्काराचा आरोप; तीन वर्ष अत्याचार केल्याचा दावा

“संजय राठोड आमचे दुश्मन नाहीत, शिवसेना तर अजिबात नाही”

ईडीची अनिल देशमुखांवर मोठी कारवाई, तब्बल इतक्या कोटींची संपत्ती जप्त

शुभमंगल सावधान! अखेर राहुल-दिशा अडकले लग्नबंधनात

“तिसऱ्या लाटेला सामोरे जायला आपण सज्ज असलो, तरी पुण्यातील निर्बंध कायम राहणार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More