बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन् तिचं स्वप्न अधूरंच राहिलं; राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूला विकावं लागतंय पार्किंग तिकीट!

नवी दिल्ली | सध्या टोकियो ऑलिम्पिकमुळे देशभरात आनंदाचं वातावरण आहे. देशातील अनेक खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकत भारताची मान उंचावली आहे. या खेळाडूंना देशभरातून लाखमोलाची बक्षिसे जाहीर केली जात आहेत. देशभरातील वातावरण खेलमय झालेलं असतानाच सध्या एका राष्ट्रीय स्तरावरील बॉक्सर खेळाडूला परिस्थितीमुळे पार्किंमध्ये तिकीट विकाव लागत असल्याचं समोर आलं आहे.

या खेळाडूच नाव ऋतू असं आहे. ऋतूने बॉक्सिंगमध्ये राष्ट्रीय स्तरावर पदक संपादन केलं आहे. बॉक्सिंगमध्ये जागतिक स्तरावर नाव कमावण्याचं आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ऋतू खूप मेहनत करत होती. मात्र, परस्थितीने ऋतूच्या स्वप्नांवर पाणी फेरलं.

ऋतूच्या वडिलांची प्रकृती ठीक नसल्याने कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी सध्या ऋतूवर आली आहे. ऋतूच्या परिवारात तिच्या कुटुंबाचा गाडा चालवण्यसाठी तिच्याशिवाय कोणीच नाही. यामुळे ती आता चंदिगढ मधील एका पार्किंगमध्ये तिकीट विकण्याचं काम करत आहे.

याविषयी खंत व्यक्त करताना ऋतू म्हणाली की, मला कुटुंबाची साथ आहे. परंतु मला कोणत्याच संस्थेकडून स्कॉलरशिप किंवा आर्थिक मदत मिळाली नाही. किमान सरकारने तरी परिस्थितीची दखल घेऊन आर्थिक मदत करावी.

थोडक्यात बातम्या –

आनंद महिद्रांनी नीरज चोप्राची केली बाहुबलीशी तुलना; म्हणाले….

फडणवीसांकडून युतीच्या चर्चेला पूर्णविराम! म्हणाले, 2024 ला आम्ही…

अबब!!! सोन्याच्या दरात आज तब्बल 1 हजार रुपयांची घट; वाचा ताजे दर

नीरज चोप्राने पूर्ण केलं भारताचं सोनेरी स्वप्न, भालाफेकमध्ये सुवर्णपदक!

महापौरांच्या कार्यालयात भूत? गार्डसोबत घडला भयानक प्रकार, महापौरांनीच शेअर केला व्हिडीओ!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More